सातारा

फलटणला 78 ग्रामपंचायती बरखास्त; 77 ग्रामपंचायतींवर प्रशासक

किरण बोळे

फलटण (जि. सातारा) : फलटण तालुक्‍यातील 78 ग्रामपंचायतींत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कालावधी संपत असल्याने या ग्रामपंचायती बरखास्त करून 77 ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रशासकांना तत्काळ कार्यभार स्वीकारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या 14 ऑगस्टच्या अंतरिम आदेशानुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार, तसेच शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होईपर्यंतच्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून फलटण पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार तत्काळ स्वीकारावा, असे निर्देश दिलेले आहेत. या प्रशासकांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 नुसार जे अधिकार व कर्तव्य सरपंच व ग्रामपंचायतीस प्राप्त होतात, ते अधिकार व कर्तव्य प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीस प्राप्त होतील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

फलटण तालुक्‍यातील विस्तार अधिकारी (पंचायत) एम. एम. चौधरी यांची बिबी, सोनगाव, नांदल, सस्तेवाडी, सांगवी, कांबळेश्‍वर, घाडगेवाडी या सात ग्रामपंचायतींवर, विस्तार अधिकारी (आरोग्य) आर. डी. झुंजार यांची कोऱ्हाळे, वडगाव, मलवडी, फरांदवाडी, मुळीकवाडी, कापशी, शिंदेनगर, आळजापूर, वाघोशी या नऊ ग्रामपंचायतींवर, विस्तार अधिकारी (कृषी) एल. एच. निंबाळकर यांची कोळकी, खुंटे, भिलकटी, सोनवडी बुद्रुक, सोनवडी खुर्द, धुळदेव, जाधववाडी (फ), तिरकवाडी, सासकल या नऊ ग्रामपंचायतींवर, विस्तार अधिकारी (कृषी) डी. डी. महांगडे यांची वडजल, कुरवली बुद्रुक, नाईकबोमवाडी, शेरेशिंदेवाडी, निंभोरे, जावली, आंदरुड, घाडगेमळा या आठ ग्रामपंचायतींवर, विस्तार अधिकारी (पंचायत) एस. जे. मोरे यांची अलगुडेवाडी, शिंदेवाडी, मिरढे, धुमाळवाडी, झिरपवाडी, सरडे, बोडकेवाडी, निरगुडी, विंचुर्णी या नऊ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) सी. जी. मठपती यांची ठाकुरकी, काशिदवाडी, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, ढवळ, फडतरवाडी, ढवळेवाडी (निं), जिंती, वाखरी या नऊ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी (पंचायत) आर. आर. भोसले यांची हनुमंतवाडी, गुणवरे, पवारवाडी, मुंजवडी, निंबळक, राजुरी, टाकळवाडे, राजाळे, जाधववाडी (तां) या नऊ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी (शिक्षण) ए. एन. संकपाळ यांची पिंपळवाडी, कोरेगाव, रावडी बुद्रुक, खराडेवाडी, होळ, मुरुम, खामगाव, रावडी खुर्द या आठ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी (पंचायत) एस. के. जमदाडे यांची आरडगाव, तांबवे, तडवळे, डोंबाळवाडी, काळज, तावडी, कापडगाव, शेरेचीवाडी (हिं), हिंगणगाव या नऊ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT