Oxygen esakal
सातारा

साताऱ्यात ऑक्सिजनचा तुटवडा; ऑडिटसाठी तपासणी पथकाची नियुक्ती

सातारा जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

बाळकृष्ण मधाळे

सातारा : सातारा जिल्ह्यात कोविड-19 चा (Coronavirus) प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. तथापि, ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा भासत आहे. एकूण ऑक्सिजन पुरवठ्याची गंभीर स्थिती पाहता ऑक्सिजन वाया न जावू देता ऑक्सिजनचा कार्यक्षम वापरणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट (Oxygen Audit) करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्याय, शासकीय तंत्रनिकेतन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व प्राध्यापक यांची सेवा 28 एप्रिलच्या आदेशानुसार अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. (Appointment Of Inspection Team For Oxygen Audit Satara News)

रुग्णालयांच्या प्रमुखांनी व संस्था प्रमुखांनी तपासणी पथकास तपासणीकरिता आल्यानंतर पीपीई कीट, फेस शिल्ड, ग्लोव्हज् परिधान करणे व काढणे या बाबतची माहिती देवून ती उपलब्ध करुन द्यावी. तपासणी वेळी आढळलेल्या त्रुटींची पूर्तता निश्चिती मुदतीत करणे बंधनकारक आहे. संबंधित रुग्णालयाने रुग्णास आवश्यक तेवढाच ऑक्सिजन पुरवठा करणे अपेक्षित आहे.

अति ऑक्सिजन पुरवठ्यामुळे गंभीर दुष्परीणाम दिसून आल्याने, रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा करावा. ऑक्सिजन ऑडीटबाबतचा त्रुटीपूर्तता अहवाल रुग्णालय प्रमुखांनी आक्सिजन ऑडीट पथकामार्फत सादर करावा. म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी Humidifer Bottle मध्ये Distilled Water टाकण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात ते उपलब्ध नसताना UV Treated प्रक्रिया उकळून केलेले थंड पाणी वापरण्याबाबत सूचना द्याव्यात. कोणत्याही परिस्थितीत साध्या नळाच्या पाण्याने भरल्या जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत रुग्णालयांना सूचना द्याव्यात.

Appointment Of Inspection Team For Oxygen Audit Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live: सत्ता कुणाची? महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज, राजकीय भवितव्य ठरणार

Indian Coast Guard Operation Video: तटरक्षक दलाची मोठी कारवाई! अरबी समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या नऊ पाकिस्तानीना पकडलं!

Indian Evacuation from Iran : इराणमधील संकटात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने सज्ज; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT