Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala esakal
सातारा

'माऊली'च्या गजरात पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन; लोणंदमध्ये किती दिवस असणार पालखीचा मुक्काम?

पालकमंत्री देसाई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

सकाळ डिजिटल टीम

पालखीच्या सातारा जिल्ह्यातील आगमन वेळी नीरा नदीत पादुकांचे स्नान संपन्न झाले. स्वागतानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला.

सातारा : माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) आज सातारा जिल्ह्यात पाडेगाव (ता. खंडाळा) येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

याप्रसंगी खासदार धैरशिल मोहिते - पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार संजय जगताप, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुण्याचे पोलीस अधिकारी पंकज देशमुख, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थामन अधिकारी देविदास ताम्हाणे, पालखी सोहळा विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala

दरम्यान, पालकमंत्री देसाई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच पोलीस विभागाने पालखीला मानवंदना दिली. पालखीच्या सातारा जिल्ह्यातील आगमन वेळी नीरा नदीत पादुकांचे स्नान संपन्न झाले. स्वागतानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. पालखी आज आणि उद्या लोणंद मुक्कामी असणार आहे. या पालखी सोहळ्यादरम्यान देसाई यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी फळ वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT