Satara Vidhan Sabha Election 2024 sakal
सातारा

Satara Assembly Election 2024 : उमेदवारांसह कार्यकर्ते वाड्यावस्त्यांवर

Satara Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे आला असून, आता उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे आला असून, आता उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला आहे. संपर्क दौऱ्यांच्या माध्यमातून पक्षाचे जाहीरनामे जनतेपर्यंत पोचविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते वाड्यावस्त्या पिंजून काढू लागले आहेत.

त्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते वाड्यावस्त्या पिंजून काढू लागले आहेत. दुसरीकडे मोबाईल कॉलच्या माध्यमातून मतदारांना आपल्यालाच का मतदान करावे, याबाबतचे आवाहन केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारातील रंगत वाढली आहे.

जिल्ह्यात आठ मतदारसंघांत सर्वच उमेदवारांनी आपापल्या परिने ताकदीने व चुरशीने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. यावेळेस एक दुसरा मतदारसंघ सोडला, तर उर्वरित सर्व ठिकाणी चुरस आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यास सुरुवात केली आहे. एरव्ही नेत्यांच्या गाड्यांचे ताफे वाड्यावस्त्यांच्या जवळून भरधाव जात होते.

आता हे ताफे वाड्यावस्त्यावरही पोचू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढल्याचे चित्र आहे.गावागावांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. यावेळेस माण-खटाव, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, कऱ्हाड दक्षिण व पाटण मतदारसंघात चुरशीच्या लढती आहेत. त्यामुळे येथील उमेदवारांनी जास्तीतजास्त मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे. त्यातून मतांची गणिते जुळवली जात आहेत.

गावागावांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. यावेळेस माण-खटाव, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, कऱ्हाड दक्षिण व पाटण मतदारसंघात चुरशीच्या लढती आहेत. त्यामुळे येथील उमेदवारांनी जास्तीतजास्त मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे. त्यातून मतांची गणिते जुळवली जात आहेत.

विरोधी उमेदवार कोणत्या भागात होता, त्याचा माग काढून पहिला उमेदवार त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेत आहे. त्यामुळे मतदारांना दोन्ही बाजूच्या उमेदवारांना हो तुम्हालाच म्हणावे लागत आहे; पण ते त्यांच्या मनात आहे तेच करणार आहेत. या माध्यमातून सध्या वाडीवस्तीवर प्रचाराच्या गाड्या व कार्यकर्ते पोचले आहेत.

मोबाईल कॉलच्या माध्यमातून (टेलिकॉलिंग) मतदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. यातून थेट संपर्क होत असला तरी या उमेदवाराच्या आवाजाच्या या टेपने अनेकांना हैराण केले आहे. एकूणच अखेरच्या टप्प्यात प्रचारात रंगत आली आहे. आता महायुती की महाविकास आघाडीला मतदार प्राधान्य देणार, याचे आडाखे बांधणेही राजकीय विश्‍लेषकांना अडचणीचे ठरू लागले आहे.

चर्चा ‘कुपन’ची...

उमेदवारांनी मतदारांना खूष करण्यासाठी विविध आमिषेही दाखवली जात आहेत. यामध्ये सध्या जेवणावळीलाही जोर आला आहे. काही निवडक हॉटेल्स व धाब्यांवर ठराविक भागातील मतदार जेवणावळीसाठी पाठविले जात आहेत. त्याचे नियोजन उमेदवारांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर दिले आहे; पण या जेवणावळीत सहभागी होण्यासाठी त्यांना कुपन दिली जात आहेत. हे कुपन असेल, तरच जेवण दिले जात आहे. बहुतांशी उमेदवारांकडून ही पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे ‘कूपन’ची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT