Sharad Pawar esakal
सातारा

लसीसाठी आमदाराची विनंती अन् शरद पवारांचा थेट सिरमच्या संचालकांना फोन

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघातील खंडाळा, वाई व महाबळेश्वर या तीन तालुक्यातील लोकांचे लवकरात-लवकर लसीकरण (vaccination) व्हावे, यासाठी कोरोनावरील व्हॅक्सिन उपलब्ध करून देण्यासंदर्भात पवारांशी चर्चा केली. (At The Request Of MLA Makarand Patil Sharad Pawar Called The Director Of Serum Directly Satara Marathi News)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि ग्रामीण भागातील रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त लोकांचे लसीकरण होणे महत्वाचे आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि ग्रामीण भागातील रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त लोकांचे लसीकरण होणे महत्वाचे आहे. याबाबत आपण काही कंपन्यांचे व्यवस्थापन आणि महाबळेश्वरातील हॉटेल व्यवसायिक यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी व्हॅक्सिनसाठी (vaccine) निधी देण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे व्हॅक्सिन उपलब्ध होईल का, या संदर्भात आपण पवार साहेबांना भेटलो. मात्र, सिरमचे सर्वेसर्वा सायरस पुनावाला (Cyrus S. Poonawalla) सध्या इथे नाहीत. त्यामुळे पवार साहेबांनी त्वरित सिरमचे इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) संचालक डॉ. जाधव (Director Dr. Jadhav) यांना फोन लावला आणि त्यांच्याशी चर्चा केली.

त्यांनी शुक्रवारी (ता. ४) आपल्याला हडपसर येथे भेटायला बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किती व्हॅक्सिन उपलब्ध होते, हे पाहुन खंडाळा, महाबळेश्वर व वाई तालुक्यातील लोकांसाठी विशेषतः विविध इंडस्ट्रीमधील कामगार यांच्यासाठी लसीकरण मोहीम राबविणार असल्याचे आमदार पाटील यांनी ई-सकाळशी बोलताना सागितले.

At The Request Of MLA Makarand Patil Sharad Pawar Called The Director Of Serum Directly Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT