सातारा

15 वर्षांपूर्वीचा विक्रम स्नेहा जाधवने ताेडला; हातोडाफेकमध्ये यश

राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : सातारा जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशनची आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिने पतियाळा (पंजाब) येथे झालेल्या 24 व्या राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धेत महिला खुल्या गटात हातोडाफेक क्रीडा प्रकारात 53.99 मीटर अंतर पार करीत 15 वर्षांपूर्वीच्या 51.89 मीटर या राखी गौंडच्या विक्रमाला मागे टाकून नवीन राज्यस्तरीय विक्रम प्रस्थापित केला. तिने राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धेत चतुर्थ स्थानापर्यंत मजल मारली. 

या यशाबद्दल तिचा व तिला मार्गदर्शन करणारे एनआयएस प्रशिक्षक दिलीप चिंचकर यांचा सातारा जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या हस्ते सन्मान झाला. उपाध्यक्ष शशिकांत पाटील, निरंजन साळुंखे, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, संजय राठोड, खजिनदार प्रा. अमितराज माने, सचिव योगेश खराडे, राष्ट्रीय खेळाडू संग्राम बाबर, मोहसीन मोमीन उपस्थित होते. 

Video पाहा : भाजप हटाव, देश बचाव; काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घाेषणांनी कराड दणाणले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing Time: SEBI चा मोठा निर्णय! शेअर बाजाराचा क्लोजिंग टाइम बदलला; आता कोणत्या पद्धतीने बंद होणार, काय बदललं?

UKSSSC पेपर लीक प्रकरणात EDची मोठी कारवाई; मुख्य आरोपीची 63 लाखांची मालमत्ता जप्त

ना सातारा, ना कोल्हापूर; कुठे सुरू आहे स्टार प्रवाहची नवी मालिका 'लाडक्या नाईक बाईं'चं शूटिंग? ऐश्वर्या नारकरांनी दाखवला सेट

Mumbai News: बदलत्या मुंबईतही टिकला १२८ वर्षांचा वारसा, १८९८ मध्ये सुरू झालेल्या किराणा दुकानाची चौथी पिढी सांभाळतेय धुरा

Latest Marathi News Live Update : २३ व्या फेरीनंतर प्रशांत किशोर १३२६९ मतांनी आघाडीवर, विजय जवळपास निश्चित

SCROLL FOR NEXT