Crime News esakal
सातारा

जावळीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : जावळी तालुक्यात (Jawali Taluka) 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 55 वर्षीय विश्वास ज्ञानेश्वर कदम (Vishwas Kadam) (लोहार) याच्या विरोधात मेढा पोलीस ठाण्यात (Medha Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (ता. 28) रोजी दुपारी दोनच्या सुमारास 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी गावामध्ये तिच्या राहत्या घरात असताना, घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या गुरांच्या गोठ्यात म्हैशीचे शेण काढण्यासाठी ती गेली असता, ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत 55 वर्षीय विश्वास कदम याने सदर मुलीस पाठीमागून बेसावधपणे पकडले व तिथेच म्हैशीच्या गोठ्यामध्ये तिच्यावर बलात्कार केला. (Atrocities On 13 Year Old Girl In Jawali Taluka Satara Crime News)

मुलीचा मोठ्याने आवाज ऐकू आल्यानंतर मुलीचा भाऊ घटनास्थळावर धावत आला व त्या मुलीची सुटका केली. या सर्व प्रकारामुळे जावळी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, मुलीचा मोठ्याने आवाज ऐकू आल्यानंतर मुलीचा भाऊ घटनास्थळावर धावत आला व त्या मुलीची सुटका केली. या सर्व प्रकारामुळे जावळी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. जावळीत या महिन्यात दोन अल्पवयीन मुलींवर अशा पद्धतीचे अत्याचार घडल्याच्या घटना घडल्या आहेत. एक घटना ताजी असतानाच जावळी तालुक्यात दुसरी घटना घडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

आरोपी विश्वास कदम (वय 55) याला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून त्याला कोर्टामध्ये देखील हजर करण्यात आले आहे. यासंदर्भात त्याला पोलिस कोठडी मिळाली असून, पीडित मुलीलाही वैद्यकीय तपासणीसाठी सातारा येथे पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने (Police Inspector Amol Mane) यांच्यासह महेश कदम व सहकारी करत आहेत.

Atrocities On 13 Year Old Girl In Jawali Taluka Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT