Jhadani Case esakal
सातारा

Jhadani Case : झाडाणीतील तब्बल 620 एकर जमीन गुजरातच्या GST आयुक्तांकडून खरेदी; 'त्या' नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द

संबंधितांनी येत्या तीन जुलैला समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सह्याद्री वाचवा मोहिमेंतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणीप्रकरणी सुरू केलेल्या लढ्याला यश मिळाले आहे.

सातारा : झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील (Jhadani Case) तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी (GST Commissioner Chandrakant Valvi) आणि त्यांच्या नातेवाइकांनी खरेदी केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पहिल्यांदा तिघांना आणि नंतर आठ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्याची सुनावणी काल झाली. या वेळी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ कमाल जमीन धारणातील ४४ ब नुसार सर्व नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द करण्यात आले आहे.

संबंधितांनी येत्या तीन जुलैला समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सह्याद्री वाचवा मोहिमेंतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणीप्रकरणी सुरू केलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. झाडाणी येथील ६२० एकर जमीन खरेदी व बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांच्यासह आणखी आठ जणांना नोटीस काढून सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार आज अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या दालनात सुनावणी झाली. यामध्ये नोटीस बजावलेल्यांनी वकीलपत्र सादर केले होते. ते महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ मधील ४४ ब कलमानुसार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी तीन जुलैला होणार असून, या वेळी नोटीस बजावलेल्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT