सातारा

तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा

सचिन शिंदे

कऱ्हाडः शासनाने जिल्हाबंदी केली. मात्र, महत्त्वाच्या कामासाठी थेट ई-पासची सुविधा नागरिकांना करून दिलेली आहे. त्याचा लाभ घेऊन कोल्हापूर, सांगलीला जाणाऱ्या वाहनांची संख्या 300 इतकी आहे. त्या प्रत्येक मोठ्या वाहनात पाच, तर लहान वाहनात तीन असे सरासरीनुसार दोन हजार 400 नागरिक दररोज सांगली, कोल्हापूर प्रवास करत आहेत. म्हणजे तीन महिन्यांत दोन लाख नागरिकांनी प्रवास केला आहे. हा प्रवास कोरोना संसर्ग वाढण्यासाठी धोकादायक ठरतो आहे.
उद्या दुपारी एक वाजता लागणार बारावीचा निकाल, 'इथे' पाहा तुमचा निकाल
 
ई-पासद्वारे कोल्हापूर व सांगलीला विविध कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यासाठी मालखेड फाटा, किणी टोलनाका अशा दोन ठिकाणी तपासणी केली जाते. त्या संबंधितांची नोंद घेतली जाते. आला कधी गेला कधी, राहणार आहात काय, अशी चौकशी केली जाते. त्यानुसार त्या नोंदी होतात, तसेच काहीवेळा गंभीर कारणे सांगून विनाकारण कोल्हापूर, सांगलीचा प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढले आहे. तो प्रवास नागरिकांच्या मुळावर येऊ लागला आहे. प्रवासात बाधितांच्या संपर्कात आल्याने कोरोनाबाधित होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात बाधित सापडले आहेत. त्यांना सांगली, कोल्हापूरच्या प्रवासाची हिस्ट्री आहे. त्यामुळे सापडलेल्या बाधिंताना रोजचा प्रवास कोरोनाबाधित होण्यास कारणीभूत ठरताना दिसत आहे. त्यामुळे आता या अधिकृत ई-पासद्वारे होणाऱ्या प्रवासावर निर्बंध लावायचा कसा, याचे आव्हान शासनासमोर आहे.

'या' सहकारी संस्थांना चिंता, 54 कोटी 40 लाख रुपये कसे परत मिळणार ? 

कोल्हापूर ; त्या डाॅक्टरांचा कोरोना अहवाल येताच संपर्कातील लोकांचा शोध सुरू
 

पोलिसांकडून ई-पासद्वारे प्रवास करणाऱ्या वाहनांची नोंद केली जाते. त्यानुसार सांगली व कोल्हापूरला प्रवास करणाऱ्या दररोज सुमारे 300 वाहनांची, तर सुटीच्या दिवशी 500 वाहनांची नोंद होते. त्यात सरासरी तीन प्रवाशी घेऊन जाणाऱ्या कारची संख्या तुलनेत जास्त आहे. दररोज 300 वाहने ये- जा करत असतील तर तीन महिन्यांत तब्बल नऊ हजार वाहनांनी ये-जा केली आहे. तब्बल दोन लाख दहा हजार नागरिकांचा प्रवास झाला आहे. तो प्रवास नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता आहे. प्रवास केल्याने कोरोना होत आहे, त्यामुळे प्रवास टाळण्याची गरज असताना प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. 

'यांच्याशी' झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन केला घाेषित 

ई-पासद्वारे शासनाने प्रवासाला परवानगी दिलेली आहे. कारणाशिवाय प्रवास करणे योग्य नाही. जास्त प्रवास केल्यामुळे कोरोनाची बाधा होऊ शकते. अलीकडच्या काळात प्रवासामुळे कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या पाहता नागरिकांनी प्रवास टाळण्याची गरज आहे.
- सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT