सातारा

रेल्वे फाटकाजवळचा उतार वाहनधारकांसाठी ठरतोय जीवघेणा; नागरिकांसाठी धोक्‍याची घंटा

अनिल घाडगे

शिरवडे (जि. सातारा) : कऱ्हाड ते मसूर रस्त्यावरील रेल्वे फाटकानजीक असलेला तीव्र चढ-उतारासह असलेले वळण वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरते आहे. मुख्य रस्त्यावरील रेल्वे फाटक नेहमीच वाहतूक कोंडीसह अपघाताला निमंत्रण देत असते. विविध कारणाने नेहमी चर्चेचा विषय बनलेल्या या फाटकाचे ठिकाण या भागातील नागरिकांसाठी धोक्‍याची घंटा ठरते आहे. तरीही त्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. 

सध्या ऊसतोड हंगाम सुरू असल्याने या रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. फाटकाजवळ मसूर बाजूकडे रस्त्याला तीव्र वळण व उतार आहे. याठिकाणी प्रामुख्याने ट्रॅक्‍टर व बैलगाड्यांची संख्या जास्त असते. रहदारीत अडथळा आल्यानंतर, फाटक बंद असताना वाहनांची रिघ लागते. अशा वेळी उसाने भरलेल्या बैलगाड्या बऱ्याचदा अडकतात. मानेवर ओझे आणि वाहनांच्या हॉर्नमुळे बैल बिथरतात. त्यामुळे बैल जखमी होणे तसेच बैलगाडीची मोडतोड होते. 

तसेच ऐन चढावर, रूळावरून जाताना अवजड ट्रॉलीसह ट्रॅक्‍टरही अडकतात. अशात वाहनधारक व ट्रॅक्‍टर, गाडीवानांत वादाचे प्रसंग होत असतात. ट्रॅक्‍टरचालक स्थानिक असल्याने त्यांचे निभावते; पण ऊसतोड मजूर बाहेरगावचे असल्याने त्यांना नाहक त्रास दिला जातो. रेल्वे फाटकावर कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ केली जाते. यासाठी येथे कारखाना हंगामात पोलिस कर्मचारी नेमण्यात यावा, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT