मोरगिरी (जि. सातारा) : पाटण आगाराच्या ग्रामीण भागात सुटणाऱ्या गाड्या नादुरुस्त असल्याने प्रवाशांना त्या सुरू करण्यासाठी ढकलाव्या लागत आहेत. पाटण आगाराने नादुरुस्त गाड्या दुरुस्त करून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील लोकांतून होत आहे. कोरोनामुळे राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे सर्व ठिकाणी वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली होती.
कालांतराने एका सीटवर एकच व्यक्ती असा नियम बनवून एसटीने प्रवासी वाहतूक सुरू केली; परंतु कोरोना आजारामुळे मोठ्या प्रमाणात या सेवेकडे लोकांनी पाठ फिरवली. सध्या नादुरुस्त गाड्यांमधून प्रवाशांच्या आणि स्वतःच्या जीववावर उदार होऊन पाटण आगारमधील चालक व वाहक एसटी सेवा बजावत आहेत. पाटण आगारामधील बहुतांशी एसटी बस नादुरुस्त आहेत. तर यातील काही गाड्या पावसाळ्यामध्ये गळक्या असल्याचे पाहण्यास मिळतात, तरी काही गाड्या कधीच वेळेवर सुटत नाहीत.
अनेक वेळा नादुरुस्त एसटीमधून प्रवास करावा लागतो, तसेच बंद गाड्या ढकलण्यासाठी प्रवाशांना पुढाकार घ्यावा लागत आहे. अशा अनेक अडचणींचा सामना करत प्रवाशांना सेवा देणाऱ्या वाहक, चालकांना नेहमीच प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सर्व प्रवासी नेहमीच होणाऱ्या या त्रासाबद्दल राग हा वाहक व चालकांवर काढत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे. पाटण आगाराने नादुरुस्त बस दुरुस्त करून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील लोकांनी केली आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.