sakal logo 
सातारा

खंडाळा तालुका बहुजन हक्क परिषदेचे उद्या आयोजन

अशपाक पटेल

शिरवळ (सातारा) : सर्व अठरा पगड जातीतील लोकांचे हक्क अबाधित रहावेत. त्यांच्या सवलती कायम रहाव्यात. तसेच खंडाळा तालुक्यातील बहुजन समाजातील सर्व लोकांच्या याबाबतीत असणाऱ्या अडचणी व विचार समजून घेण्यासाठी शिरवळ-लोणंद रस्त्यावरील गणेश मंगल कार्यालय, पिसाळवाडी (ता.खंडाळा) येथे बुधवारी (ता.14) सकाळी दहा वाजता तालुका बहुजन हक्क परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती खंडाळा तालुका बहुजन हक्क परिषदेच्या संयोजकाकडून देण्यात आली.

भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना अधिकार दिले आहेत. तसेच भारताच्या स्वातंत्र्यापासून विविध जाती धर्मांना आवश्यकतेप्रमाणे आरक्षणेही दिली आहेत . सर्व मागास घटकांनी समाजाच्या समान प्रवाहात यावे. त्यांचा स्तर उंचवावा, हा त्यामागील खरा उद्देश आहे. ही आरक्षणे आजही कायदयाने कायम आहेत. सध्या विविध क्षेत्रातील आरक्षणासाठी अनेक घटकांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांना ते मिळण्यासाठी बहुजन हक्क परिषद ही त्यांच्या पाठीशी आहे. सरकार त्यावर योग्य विचार करेलही माञ बहुजन समाजातील (ओबीसी, एन टी, एससी, एस.टी ) सर्व अठरा पगड जातीतील लोकांचे हक्क अबाधित रहावेत. 

त्यांच्या सवलती कायम रहाव्यात, म्हणून खंडाळा तालुक्यातील बहुजन समाजातील नागरिकांनी बुधवारी (ता.14 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता पिसाळवाडी येथे बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हक्क परिषदेकडून करण्यात आले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT