सातारा

'बहुजनांच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण द्या'; खंडाळ्यात बुधवारी मोर्चा

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : येत्या बुधवारी (ता. नऊ) येथील तहसील कार्यालयावर काढण्यात येणारा बहुजन हक्क बचाव मोर्चा यशस्वी करण्यासाठी बहुजन समाजातील नेते, कार्यकर्ते अहोरात्र झटताना दिसत आहे. तालुक्‍यातील भाटघर ते कोपर्डे व लिंबाचीवाडी ते शिंदेवाडीपर्यंतच्या सर्व गावांत विविध समाजातील बैठका होत आहेत. 

पिसाळवाडी (ता. खंडाळा) येथे बहुजन समाजाची हक्क परिषद बुधवार 14 ऑक्‍टोबर रोजी झाली. त्यात बहुजन समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे व जातनिहाय जणगणना करावी, असे ठराव घेण्यात आले. यानंतर गावोगावी बैठका घेण्यात आल्या. अहिरे येथे 30 ऑक्‍टोबर रोजी बैठक घेऊन एक समिती गठित करण्यात आली. 

17 नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे स्मारकास अभिवादन करून जनजागृतीची सुरुवात करण्यात आली. 25 नोव्हेंबर रोजी शिंदेवाडी येथे बहुजन आरक्षण बचाव संवाद बैठक घेण्यात आली. यावेळी समता परिषदेचे बापूसाहेब भुजबळ उपस्थित होते. यानंतर 30 नोव्हेंबर रोजी संवाद बैठक पार पडली. दोन डिसेंबरला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षण द्यावे. मात्र, आमचे आरक्षण अबाधित ठेवावे, या प्रमुख मागणीसाठी नऊ डिसेंबर रोजी पारगाव-खंडाळा बस स्थानक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे बहुजन हक्क समितीने सांगितले.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: मुंबईकरांचा 'रविवार'चा प्रवास कठीण! तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलच्या वेळापत्रकात बदल; वाचा सविस्तर

Pune DJ Noise Rules: ध्वनिमर्यादा ओलांडल्यास कारवाई; दहीहंडी, गणेशोत्सवात ‘डीजे’च्या दणदणाटावर पोलिसांची नजर

Maratha Kunbi Debate: ‘मराठा हा कुणबी नाही’; डॉ. संजय लाखेंचा दावा, हैदराबाद गॅझेटवरून आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद

Marathi News Live Updates: शिक्षकांच्या धरणे आंदोलनाने पुण्यात वातावरण तापले, संचमान्यतेच्या प्रस्तावित निकषांना तीव्र विरोध

IND vs PAK: महिला आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना FREE मध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या LIVE ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT