Bahule Villagers
Bahule Villagers esakal
सातारा

बाहुलेत गावकऱ्यांची एकजूट; कोरोनाला केलं कायमचं हद्दपार

संदीप गाडवे

केळघर (सातारा) : बाहुलेतील ग्रामस्थांनी (Bahule Villagers) अखेर कोरोनावर मात केली. साखळी खंडित होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन केले. गावकऱ्यांच्या एकीच्या बळावर कोरोनाला हुसकावून लावले. (Bahule Villagers Won The Battle Against Coronavirus Satara News)

बाहुलेत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेक बाधित सापडले. त्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली होती. या ग्रामस्थांनी अनेकांच्या मदतीतून कोरोनावर मात केली. या ग्रामस्थांच्या मदतीला तालुक्‍यातील समाजसेवक धावून आले. ज्ञानदेव रांजणे यांनी जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. विजय सावले, विनोद शिंगटे यांच्याकडून "व्हिटॅमिन सी'च्या गोळ्या, राजेंद्र धनावडे यांनी सॅनिटायझर दिले. केळघरचे सरपंच रवींद्र सल्लक यांनी संपूर्ण गावात फवारणी केली.

आशा सेविका ललिता जाधव, रूपाली ओंबळे, लता देसाई, संगीता जाधव यांनी संपूर्ण गावातील लोकांना उपचारासाठी नियोजन केले. बाहुलेतील मुंबईत व्यवसाय व नोकरीनिमित्त असणाऱ्या तरुणांनी एकत्र येत "बाहुले इलेव्हन'च्या माध्यमातून व मुंबईतील तीन मंडळांच्या पुढाकाराने गावातील बाधित कुटुंबांना वाफ घेण्याच्या मशिन, ऑक्‍सिमीटर, तापमापक, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, मास्कसह वैयक्तिक मदतही केली. जननीमाता क्रिकेट क्‍लबने दहा हजार रुपयांची मदत केली. या सर्व प्रयत्नांतून बाहुले गाव अखेर कोरोनामुक्त झाले.

सर्वांच्या सहकार्याने बाहुले गाव कोरोनामुक्त झाले असून अडचणीच्या काळात गावाला मदत करणाऱ्या समाजसेवक, लोकप्रतिनिधी यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.

जगन्नाथ जाधव, ज्येष्ठ नागरिक, बाहुले

Bahule Villagers Won The Battle Against Coronavirus Satara News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT