सातारा

पवार साहेबांच्या विचारानेच 'महाविकास आघाडी'ची स्थापना : बाळासाहेब पाटील

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : जनसामान्यांचा विकास हा महाविकास आघाडीचा विचार आहे. पवार साहेबांच्या विचारानेच महाविकास आघाडीचे शासन स्थापन झाले. मात्र, कोरोना काळात फक्त राजकारणासाठी विरोधी भूमिका घेण्याचे काम विरोधकांनी केले असल्याचे मत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

पाल येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी व कोव्हिड योद्ध्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने राज्याचा महसूल कमी झाला. त्याचा परिणाम विकास कामांवर झाला. महाविकास आघाडीने महात्मा फुले कर्ज माफी योजना त्वरीत लागू केल्याने शेतकरी कर्ज मुक्त झाला. सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्या सेवा सोसायटी इमारतीचे उद्घाटन केले आहे. 

ऋतुराज पाटील म्हणाले, कमी वयात आमदार होता आले. समाजकारण, राजकारण करण्याची संधी लाभली असून महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची संधी मिळाली आहे. राज्याचे भविष्य घडविण्याची ताकद महाविकास आघाडीत असून विरोधक आमच्या पट्यात आला की कार्यक्रम होणार, असा टोला त्यांनी लगावला. श्रीनिवास पाटील म्हणाले, कुठलेही काम करताना चातुर्याने करायची कला पाहिजे. जात, पात, लिंग भेद न ठेवता एकत्र राहिले तर नक्कीच प्रगती होते. यावेळी मानसिंगराव जगदाळे, चंद्रकांत जाधव, उद्धवराव फाळके यांनी मनोगत व्यक्त केले. देवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सर्जेराव खंडाईत यांनी आभार मानले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Masti 4 X Review: अडल्ट कॉमेडीचा ओव्हरडोस! कसा आहे आफताब- रितेश- विवेकचा 'मस्ती ४'? एक्सवर नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

SCROLL FOR NEXT