सातारा

नुकसान भरपाई द्या, अन्यथा रोषाला सामोरे जा; 'बळीराजा'चा इशारा

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना कोणताही निकष न लावता सरसकट हेक्‍टरी 50 हजार मदत तत्काळ द्यावी आणि शेती पंपाचे संपूर्ण वीजबिल राज्य सरकारने माफ करावे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आज (सोमवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

संघटनेच्या मागण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष सुनील कोळी, तालुकाध्यक्ष नजीर पटेल, प्रकाश पाटील, बापू भोसले व शेतकऱ्यांनी मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बी-बियाणे लावण्यापासून ते उत्पादित माल हातामध्ये येण्यापर्यंत शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. रासायनिक खतांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. मजुरीचे दर डबल झाले आहेत. त्यातूनही काही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातामध्ये आले तर कधी निसर्गनिर्मित, तर कधी मानवनिर्मित संकटे यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. 

महापुरात शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यानंतर कोरोना आला. त्यात शेतकऱ्यांची कुटुंबे आणखीन उद्‌ध्वस्त झाली. अतिवृष्टीमुळे शेतकरी पूरता मेटाकुटीला आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरसकट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रतिहेक्‍टर शासकीय मदत तत्काळ द्यावी आणि शेती पंपाचे वीजबिल माफी सरकारने करून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी. अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT