सातारा

ठाकरे सरकार : लग्नाला परवानगी; धार्मिक कार्यक्रमांना का नाही? ज्येष्ठ किर्तनकार उवाच

व्यंकटेश देशपांडे

फलटण ः सोशल डिस्टन्सिंग सांभाळून व कमी गर्दी करून विवाह सोहळे होत आहेत. सर्व शासकीय कार्यालये, दळणवळण, बाजारपेठा आदी सर्व सुरू झाले असताना धार्मिक कार्यक्रमांनाच का परवानगी देत नाही, असा सवाल ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर यांनी उपस्थित केला आहे. 
काय सांगता... दहा रुपयांत मिळणार एलईडी बल्ब! 

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, येथ कीर्तन, प्रवचन, भजन आदी कार्यक्रमांतून होणारे सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरत असल्याचे प्रशासनाला ज्ञात आहे. यापूर्वी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व संवर्धन किंवा ग्रामगीतेमधून नागरी सुविधा, ग्रामीण विकासाचे प्रबोधन तर वर्षानुवर्षे झाले असताना राज्यभर या सर्वांवर बंदी घालून शासन नेमके काय साध्य करत आहे, असा सवाल कऱ्हाडकर यांनी उपस्थित केला आहे.

व्वा..! या खेडेगावात गणेशोत्सवातील खर्चातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना  

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाने आषाढी, चैत्री वारी बंद केली. सर्व मंदिरे बंद ठेवली. मात्र, लग्न सोहळ्यांना संख्येची मर्यादा घालून परवानगी देत आहे. तद्वत मंदिरे खुली केली, कीर्तन, प्रवचन, भजनांना परवानगी दिली तर अध्यात्मिक प्रबोधनाबरोबर कोरोनासंबंधी योग्य प्रबोधन त्या माध्यमातून मास्क, सॅनिटायझर वापर, सामाजिक अंतर, गर्दी टाळणे या बाबी कीर्तनकार, प्रवचनकार सर्वसामान्यांना खूप चांगल्या प्रकारे समजावून देतील, याची ग्वाही श्री. कऱ्हाडकर यांनी दिली आहे. 

खासगी रुग्णालयात क्लेम करण्यात अडचण येत आहे, मग हे वाचाच

महाबळेश्वरात प्रवेशप्रक्रिया केंद्र सुरू, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी पंचायत समितीचा उपक्रम

महाराष्ट्र ही अध्यात्मिक भूमी आहे. पंढरीचा पांडुरंग हे वारकरी सांप्रदायाचे आद्यपीठ आहे, तर संतांची तीर्थक्षेत्र ही विद्यापीठे आहेत. याच क्षेत्रावर सामाजिक अंतर राखून भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू करणे गरजेचे आहे. शासनाने चैत्री व आषाढी वारीवर बंदी घातली त्यावेळी संपूर्ण जगावर कोरोनाचे महासंकट आल्यामुळे वारकऱ्यांनीही शासनाला साथ केली, असेही श्री. कऱ्हाडकर यांनी म्हटले आहे.  

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Miraj Expansion : कुठे वाढणार महापालिकेचा विस्तार? तीनही शहरांचे केंद्र बदलले; 'या' भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडणार?

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT