Bandatatya Karadkar esakal
सातारा

अस्मानी संकटामुळे शेतकरी नैराश्याच्या गर्तेत अडकलाय

बंडातात्या कऱ्हाडकरांकडून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

संदीप गाडवे

केळघर (सातारा) : अतिवृष्टीमुळे जावळी तालुक्यातील (Heavy Rain In Jawali Taluka) डोंगरकपारीत व दऱ्याखोऱ्यांत राहणारा शेतकरी पुरता उद्‌ध्वस्त झाला आहे. केवळ शेतीवरच उदरनिर्वाह असलेला शेतकरी वर्ग या अस्मानी संकटामुळे नैराशाच्या गर्तेत अडकला आहे. या शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो असून, मदत एक निमित्त असल्याचे प्रतिपादन ज्‍येष्ठ कीर्तनकार व व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक बंडातात्या कऱ्हाडकर (Bandatatya Karadkar) यांनी केले. (Bandatatya Karadkar Helped The Citizens Affected By The Rain And Landslide bam92)

अतिवृष्टीमुळे जावळी तालुक्यातील डोंगरकपारीत व दऱ्याखोऱ्यांत राहणारा शेतकरी पुरता उद्‌ध्वस्त झाला आहे.

वाहिटे (ता. जावळी) येथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, जावळी वारकरी संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण महाराज शिंदे, विजयमहाराज शेलार, विलासबाबा जवळ, बजरंग चौधरी, राजेंद्र जाधव, दीपक महाराज, नंदु जगताप, महाराष्ट्रातून आलेले व्यसनमुक्त संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या भागातील गरीब व गरजू मुलांना राष्ट्रबंधु राजीवजी दीक्षित गुरूकुलमध्‍ये मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत.

वाहिटे, बाहुळे, भुतेघर व बोंडारवाडी या गावात आम्ही मदत दिली असली तरी ही मदत पुरेशी नाही. समाजातील लोकांनी पुढे येऊन या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही कऱ्हाडकर यांनी केले. तहसीलदार पोळ यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती व मदतकार्याची माहिती दिली. आपण पलुस तालुक्यात असताना व्यसनमुक्त संघाने २०१९ मध्ये बुर्ली गाव दत्तक घेतल्याचा उल्लेख करून संघाच्या कार्याचे कौतुकही केले. अमोल माने यांनीही कऱ्हाडकर व व्यसनमुक्त युवक संघ मदतीसाठी पोचल्याबद्दल आभार मानले.

Bandatatya Karadkar Helped The Citizens Affected By The Rain And Landslide bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT