Satara Bank Election esakal
सातारा

निवडणुकीत होणार दहा लाखांचा चुराडा; उमेदवाराला दोन लाखांची मर्यादा

सभासदांमागे 215 रुपये खर्चाची परवानगी

उमेश बांबरे

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी एका सभासदामागे २१५ रुपये खर्च करण्यास सहकार विभागाला परवानगी आहे.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) एका सभासदामागे २१५ रुपये खर्च करण्यास सहकार विभागाला परवानगी आहे. जिल्हा बॅंकेचे १९६४ सभासद असून, ते या निवडणुकीत मतदान करणार आहेत. एका उमेदवाराला खर्च मर्यादा दोन लाखांची आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर तब्बल दहा लाख रुपयांचा चुराडा या निवडणुकीत होणार आहे.

जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता दिवाळीच्या (Diwali Festival) दोन दिवसांची सुटी वगळता चारच दिवस उरले आहेत. दहा तारखेला निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या संचालकांच्या २१ जागांसाठी १४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळेस प्रथमच निवडणूक चुरशीची होत आहे. अनेका दिग्गजांसह दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते रिंगणात आहेत. सहकार विभागाला निवडणुकीसाठी सभासदामागे २१५ रुपये खर्च मिळतो.

त्यानुसार जिल्हा बॅंकेचे एकूण मतदार सभासद १९६४ असून, त्यांच्यासाठी चार लाख २२ हजार २६० रुपये सहकार विभागाला खर्च करावे लागणार आहेत. २१ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात राहिले, तर त्यांना दोन लाख रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. त्यामुळे त्यांचे आठ लाख ४० हजार रुपये खर्च होतील; पण सध्या तीन जागा बिनविरोध आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आणखी काही उमेदवार बिनविरोधची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांसाठी मतदान घ्यावे लागणार आहे. त्यासाठी लागणारी यंत्रणा व इतर कामांसाठी निधी खर्च होणार आहे.

तालुकानिहाय मतदार

सोसायटीचे तालुकानिहाय मतदार : सातारा १४५, कऱ्हाड १४०, फलटण १३१, पाटण १०३, खटाव १०३, माण ७४, खंडाळा ५१, महाबळेश्वर ११, कोरेगाव ९०, वाई ५९, जावळी ४९. खरेदी- विक्री संघ ११, कृषी उत्पादन प्रक्रिया २७, गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था २७२, औद्योगिक व मजूर संस्था ३२४, राखीव जागांसाठी सर्व १९६४ मतदार मतदान करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Criminal Law: विवाहपूर्व संबंध ठेवणे; सरकारवर टीका करणे गुन्हा ठरणार, नवा कायदा लागू, नव्या तरतुदींमुळे मोठी उलथापालथ

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

January Horoscope 2026: जानेवारी महिन्यात कोणत्या राशींवर राहणार रोचक राजयोग? टॅरो कार्ड्सनुसार जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

SCROLL FOR NEXT