सातारा

कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवहार बंद

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर येथे कोरोनाचे पुनरागमन झाले आहे. एकाच कुटुंबातील दोघांसह एक बॅंक कर्मचारीही कोरोनाबाधित आढळले असतानाही नागरिक व व्यावसायिकांत मात्र त्याबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र मंगळवारी येथील आठवडा बाजारात दृष्टीला पडले. केवळ कारवाई टाळण्यासाठी तोंडावर मास्क अडकविलेल्या बाजारकरूंनी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरच्या वापराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. 

गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण न सापडल्याने ढेबेवाडी खोरे सुटकेचा श्वास सोडत असतानाच कालपासून पुन्हा येथे नवीन रुग्ण सापडायला सुरुवात झाल्याने अस्वस्थता वाढली आहे. काल येथे एकाच कुटुंबातील दोघांचे तर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या येथील शाखेतील एका कर्मचाऱ्याचे कोरोना तपासणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी बाहेर फिरू नये, आवश्‍यक तपासण्या करून घ्याव्यात, अशा स्पष्ट सूचना असतानाही त्यापैकी काहीजण निवांत फिरताना दिसत आहेत. सरपंच अमोल पाटील, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे यांच्यासह आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दोन ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करून आवश्‍यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

पुणे- मुंबईला जाणा-या प्रवाशांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार बॅंकेचे व्यवहार तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत. कोरोना पुन्हा वाढत असतानाही त्याबाबत नागरिकांत मात्र फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र आज येथील आठवडा बाजारात दृष्टीला पडले. केवळ कारवाई टाळण्यासाठी तोंडावर मास्क अडकविलेल्या बाजारकरूंनी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरच्या वापराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. 

दरम्यान ग्रामपंचायतीच्या सूचनेनूसार बॅंकेचे व्यवहार शुक्रवारपर्यंत (ता. 26) बंद राहणार आहेत. त्यानंतर पुन्हा जाेडून सुट्ट्या आल्याने चार एप्रिलपर्यंत ग्राहकांसाठी (30 मार्च व्यतरिक्त) बॅंकेचे कामकाज बंद राहणार आहे. गावात एटीएम सेंटर असल्याने ग्राहकांना पैसे काढण्यासाठीची अडचण भासणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात शिक्षा जाहीर; भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप यावर निर्णय?

SCROLL FOR NEXT