सातारा

जमावबंदी आदेश लागू; बावधन बगाड यात्रेत ग्रामस्थांनी भावनांना आवर घालावा : संगीता राजापूरकर

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : बावधन बगाड यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. राज्याचे ते वैभव आहे; परंतु कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रशासनाने बगाड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले यांनी केले. 27 मार्चपासून सुरू होणारी बावधन बगाड यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणीची माहिती देण्यासाठी बावधन ग्रामपंचायतीत प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्रीमती राजापूरकर बोलत होत्या. 

पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक आनंद खोबरे, शशिकांत पिसाळ, वसंतराव पिसाळ, राजेंद्र कदम, अंकुश कुंभार, सरपंच शुभांगी कांबळे, मदन भोसले, दीपक ननावरे, उदयसिंह पिसाळ, विजयसिंह पिसाळ, विश्वास पिसाळ यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. शीतल खराडे म्हणाल्या, ""प्रशासनाला सहकार्य करणारे गाव अशी बावधनची ओळख आहे. याच भावनेतून कोरोनाचा प्रसार वाढताना ग्रामस्थांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. यात्रेवर निर्बंध घालण्यात आले असून, 144 कलम लागू करण्यात आल्याने 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. 

धार्मिक विधी करणाऱ्या 5 लोकांची नावे ग्रामस्थांनी प्रशासनाला कळविणे आवश्‍यक आहे.'' तहसीलदार रणजित भोसले, शशिकांत पिसाळ, वसंतराव पिसाळ यांचीही भाषणे झाली. या वेळी सरपंच शुभांगी कांबळे, तानाजी कचरे यांनी स्वागत केले. उपसरपंच उदयसिंह पिसाळ यांनी आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT