सातारा

शिष्यवृत्तीच्या बहाण्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना गंडा!

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : कोरोना काळामध्ये पालकांवरील बारावीनंतरच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी आयआयबीएम शिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येत असून, त्यासाठी पालकांनी पाठवलेल्या लिंकवर 550 रुपये भरून नोंदणी करावी, असा पालकांच्या व्हॉट्‌सऍपवर मेसेज व संबंधित लिंक पाठवण्यात येत आहे; परंतु शासनाची अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती नसल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातून देण्यात आली असून, हा एक प्रकारे पालकांना गंडा घालण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षकाने राबविलेल्या स्टोरी ऑन फोन उपक्रमास जागतिक पुरस्कार 
 
कोरोनामुळे रोजगारास मुकल्यामुळे व व्यवसाय अडचणीत आल्यामुळे आधीच लोक आर्थिक संकटात आहेत. बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांचेही निकाल जाहीर झाले असून, सध्या अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन व अन्य व्यावसायिक शिक्षणांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. अशा वेळी बारावी उत्तीर्णांच्या सर्रास पालकांना दूरध्वनी करून या शिष्यवृत्तीची माहिती देण्यात येत असून, त्यानंतर व्हॉट्‌सऍपवर लिंकही पाठवली जात आहे. स्वच्छ मराठी बोलू न शकणारी परराज्यातील महिला दूरध्वनीवरून उत्तीर्ण झालेल्यांचे संपूर्ण नाव सांगत असल्याने पालकांचाही त्यावर विश्वात बसत आहे; पण लिंकवर पाठवलेली माहिती पूर्ण भरल्यानंतर शेवटी 550 रुपये भरल्यानंतर नोंदणी पूर्ण होत असल्याने काही पालकांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे. शिष्यवृत्तीसाठी शासन कधीही पैसे घेत नाही. शिवाय एखाद्या पालकाने लिंक पूर्ण भरली नाही, तर त्याला वारंवार दूरध्वनी करून, तसेच व्हॉट्‌सऍपवर मेसेज पाठवून नोंदणी करण्यासाठी तगादा लावला जात आहे. मात्र, हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालकांनाे थांबा! मुलांना वाहन चालविण्यास देऊ नका, कऱ्हाडला पहा काय झाले

आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना चांगल्या व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश मिळावा, त्यांचे भवितव्य घडावे, ही प्रत्येक पालकाची स्वाभाविक इच्छा असते. कोरोनामुळे कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना लोक मुलांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत. प्रवेश परीक्षा, कागदपत्रांची जमवाजमव व त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाणे हे खर्चिक असतानाच शिष्यवृत्तीच्या या फसव्या आमिषाला कोणी बळी पडू नये. 

शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून कधीही अशा प्रकारे पैसे मागितले जात नाहीत. तेव्हा अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडता पालकांनी दक्ष राहावे.

 विश्वजित घोडके, सहायक पोलिस निरीक्षक, पुसेगाव पोलिस ठाणे 

राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाच्या वतीने शिष्यवृत्ती देताना त्याचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी कोणतीही लिंक पाठवली जात असून, 550 रुपयांची शिष्यवृती शासनाची नाही. याबाबत पालकांनी दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे.
 रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT