be prepared to step down from power if there is injustice OBC community warn government maratha obc reservation Sakal
सातारा

Satara News : अन्याय होणार असेल तर सत्तेवरुन पायउतार होण्याची तयारी ठेवा; ओबीसी समाजाचा सरकारला इशारा

आरक्षण मुद्द्यावरुन फलटण तालुक्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे

किरण बोळे

फलटण शहर : आरक्षण मुद्द्यावरुन फलटण तालुक्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी समाजामध्ये सत्तेवर बसविण्याची व सत्तेवरुन पायउतार करण्याची ताकद आहे हे कोणी विसरु नये. जर ओबिसी समाजावर अन्याय होणार असेल तर सत्तेवरुन पाय उतार होण्याची तयारी ठेवा असा इशारा सरकारला फलटण येथील ओबीसी समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

अंबड जि. जालना येथे शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर रोजी 'आरक्षण बचाव एल्गार सभेचे' आयोजन करण्यात आले आहे. या सभेस तालुक्यातील हजारो ओबीसी समाज बांधव जाणार असुन त्यासाठी संत सावता माळी महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सदर इशारा देण्यात आला आहे. यावाळी बैठकीत विविध समाजातील बांधव उपस्थित होते. प्रत्येकाने आरक्षणा संदर्भात आपली भुमिका मांडली.

ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये. सात सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने काढलेला जीआर ताबडतोब रद्द करावा यासह अन्य प्रमुख मागण्या मान्य कराव्यात यासाठी मोठा लढा उभारण्याचा निर्धारही यावेळी बैठकीमध्ये करण्यात आला.

मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार पुर्णपणे ओबीसी समाजाला आरक्षण मिळायला हवे. आरक्षणाच्या मुद्द्यावर फलटण तालुक्यातील समाज एकवटला आहे. महाराष्ट्रात सरकारला ओबिसींची ताकद काय आहे हे दाखवून देणार आहोत. या लढ्यात धनगर व माळी समाज मोठ्या भावाची भूमिका बजावेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबिसी समाज एकवटला असुन पुढील काळात ओबिसीची ताकद दाखवून देण्यात येइल. अगामी काळात केवळ सामाजिक व शैक्षणिकच नव्हे तर राजकीय सत्तेतही ओबीसींचा सहभाग वाढविण्याचा निर्धार यावेळी अनेकांनी बोलून दाखविला. राज्यभरात वारंवार ओबीसी समाजाच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे.

ओबिसी समाजाच्या नेत्यांचा अपमान म्हणजे सकल ओबिसी समाजाचा अपमान आहे हे कोणी विसरु नये. आपल्या हक्काच आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी हा लढा आहे. ओबिसी आरक्षणासाठी लढणार्या व झगडणार्या नेतृत्वालाच अगामी काळात ओबीसी समाज पाठबळ देणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जालना जिल्ह्यातील अंबड येथे अंबड तालुका व जालना जिल्ह्यातील सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्यांक समाज यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'आरक्षण बचाव एल्गार' सभेला फलटण तालुक्यातुन हजारो समाजबांधवांची ऊपस्थिती लावण्याचा निर्धार सकल ओबीसी समाज फलटण यांच्यावतीने करण्यात आला आहे. बैठकीस फलटण शहर व ग्रामीण भागातील विविध समाजातील लोक समाज संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT