सातारा

सातारा जिल्ह्यातील बेडची माहिती आता एका क्लिकवर..

Balkrishna Madhale

सातारा : जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयात ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.

मंत्री पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कोविड-१९ मुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, तसेच ही केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून या covid19satara.in लिंकद्वारे रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होणार आहे. एखाद्या तालुक्यात बेड उपलब्ध नसेल, तर दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात बेड उपलब्ध आहे का नाही, याची माहिती मिळू शकते आणि बेड आभावी उपचार न मिळण्याच्या अडचणीही दूर होण्यास मदत होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, कोरी रोशन सोल्युशन एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित तोडकर यांनी याचे सादरीकरण केले. याबाबत काही अडचण असल्यास, टोल फ्री क्रमांक 1077 हा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

या लिंकद्वारे तालुक्यातील बेडची संख्या जाणून घ्या

covid19satara.in लिंकवर जाऊन क्लिक करा

बेड आभावी उपचार मिळत नसल्यास टोल फ्री क्रमांक 1077 वरती संपर्क साधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT