KIsanvir Sugar Factory Sakal
सातारा

‘किसनवीर’च्या कामगारांचे ठिय्या आंदोलन मागे - मदन भोसले

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पगारासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवार (ता. २१) पासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पगारासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवार (ता. २१) पासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

वाई - भुईंज (ता. वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या (Kisan Veer Sugar Factory) कामगारांनी (Worker) आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन (Agitation) आज तिसऱ्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले (Madan Bhosale) यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पगारासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवार (ता. २१) पासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात चारशे कामगार सहभागी झाले होते. आज आंदोलनाचा तिसरा दिवस होता. दुपारी चार वाजता कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले आंदोलनस्थळी दाखल झाले. या वेळी कामगार प्रतिनिधींनी त्यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. श्री. भोसले यांनी त्यावर कामगारांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली.

तुमच्या सर्व मागण्या ज्ञात आहेत. त्या अवास्तव नाहीत. २७ टक्के वेतनवाढीचा प्रश्न महिनाअखेरपर्यंत मार्गी लावण्यात येईल. ग्रॅज्युइटी व प्रॉव्हिडंट फंडाचे हप्ते लवकर भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. हंगामी कामगारांच्या ग्रेडेशन प्रश्न मार्गी लावून त्यांना कायम करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कामगारांनी सहकार्य करावे, अशी विनंती श्री. भोसले यांनी कामगारांना केली. श्री. भोसले यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर कारखाना सुरू झाला, तरच आपले प्रश्न मार्गी लागतील, हे लक्षात घेऊन कामगार प्रतिनिधींनी आंदोलन मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangram Patil: सरकारविरोधी भूमिकेची किंमत? लंडनहून मुंबईत उतरताच डॉ. संग्राम पाटील यांना अटक; प्रकरण चर्चेत

Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात भरतीची संधी!, बारावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

दुसरी खेलो इंडिया बीच स्‍पर्धा : महाराष्ट्राची रूपेरी सांगता; साताऱ्याच्या दिक्षा यादवला रौप्‍यपदक

Viral Video : झाडावर नग्न अवस्थेत चढला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ! टीका सोडून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Bangladesh News: मकर संक्रांती साजरी करू नका, नाहीतर परिणाम भोगा! बांगलादेशात हिंदूंना उघड धमकी, कुणी दिला इशारा?

SCROLL FOR NEXT