सातारा

पालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ; प्रशासनाचे आदेश

गिरीश चव्हाण

सातारा : गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारी सातारा पालिकेतील 36 कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोनानुसार वेतननिश्‍चिती पूर्ण झाली. या वेतननिश्‍चितीमुळे त्या कर्मचाऱ्यांना आत्ता सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे सुकर झाले आहे. 

पालिकेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 36 कर्मचाऱ्यांची सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसारची वेतननिश्‍चिती अनेक वर्षे प्रलंबित होती. याबाबत त्या कर्मचाऱ्यांनी नगर विकास विभागाकडे दाद मागितली होती. यानंतर नगरविकास विभागाने त्या 36 कर्मचाऱ्यांची वेतन आयोगानुसार वेतननिश्‍चिती करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश सातारा पालिकेच्या तत्कालीन प्राशासकीय अधिकाऱ्यांनी बासनात गुंडाळून ठेवले होते. 

पालिकेचा पदभार अभिजित बापट यांनी स्वीकारल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी भेट घेत वेतननिश्‍चिती करण्याची मागणी केली होती. याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांनी या प्रश्‍नाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. खासदार उदयनराजेंनी त्यानुसार बापट यांना सूचना केल्या होत्या. यानुसार त्या कर्मचाऱ्यांची वेतननिश्‍चिती अंतिम करण्यात आली. यामुळे त्या 36 कर्मचाऱ्यांनी गुरुवारी जलमंदिर येथे जावून खासदार उदयनराजे यांची भेट घेत आनंद व्यक्‍त केला. यानंतर त्यांनी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT