सातारा

Bharat Band Updates : साताऱ्यात 'स्टॅंड विथ फार्मर'चा नारा; जिल्हाभरात निदर्शने, सत्याग्रह

गिरीश चव्हाण

सातारा : केंद्राच्या कृषीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्यावतीने निदर्शने, तसेच पोवईनाका परिसरात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आज झालेल्या बंदमध्ये विविध संघटना, राजकीय पक्ष सहभागी झाल्याने बंदमध्ये व्यापारी व नागरिकांनी आपला उस्फूर्त प्रतिसाद नोंदवत स्टॅंड विथ फार्मरचा नारा दिला. 

केंद्राच्या कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांचे दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे. 12 दिवस सुरु असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. यानुसार सातारा येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवत जिल्हा, तसेच सातारावासियांनी आम्ही स्टॅंड विथ फार्मरचा संदेश संपूर्ण देशाला, राज्याला दिला. 

आंदोलनाचा एक भाग म्हणून ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस, तसेच अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकरी आंदोलनास पाठिंब्याचे पत्रक आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या याच आंदोलनास वंचित बहुजन आघाडीने सुध्दा पाठिंबा दिला असून त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिब्याचे पत्र आज जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले. सातारा येथील पोवईनाका परिसरात किसान आंदोलन समर्थन संयुक्‍त मंचच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यात शहर सुधार समितीचे विक्रांत पवार, अस्लम तडसरकर, शिवाजी राउत, सुरेश बोतालजी,विजय मांडके व इतर संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. याठिकाणी उपस्थित असणाऱ्यांनी केंद्र सरकारने केलेल्या तीन कायद्यांवर कडाडून टीका करत ते रद्द करण्याची मागणी केली.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT