Khambatki Ghat esakal
सातारा

Khambatki Ghat : पुणे-सातारा महामार्गावरुन प्रवास करत असाल, तर ही बातमी खूप महत्त्वाची; खंबाटकी घाटात कोंडीची काय आहे स्थिती?

आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिवशाही एस.टी बस (Shivshahi ST Bus) घाटाच्या चौथ्या वळणावर रस्त्याच्या मधोमध बंद पडली.

अशपाक पटेल

यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक घनवट व महामार्ग पोलिसांच्या मदतीने इतर वाहनांना वाट करून दिल्याने दोन तासांत वाहतूक सुरळीत झाली.

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) सातारा बाजूकडे जाताना आज (शुक्रवार) दुपारी वाहनांची मोठी कोंडी झाली होती. तसेच आज दिवसभर वाहने कासव गतीने घाटाकडे जात असल्याचे चित्र होते.

याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिवशाही एस.टी बस (Shivshahi ST Bus) घाटाच्या चौथ्या वळणावर रस्त्याच्या मधोमध बंद पडली. परिणामी, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. या प्रसंगी जवळपास चार ट्रक, दोन एसटी बस व पाच ते सहा चारचाकी (कार) वाहने बंद पडली.

मात्र, या गाड्या बाजूला करण्यासाठी ४ महामार्ग प्राधिकरणची (एनएचआय) सुविधा उपलब्ध नसल्याने महामार्ग पोलिसांना (Highway Police) ढकलून ही वाहने रस्त्याच्या बाजूला करावी लागली. यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक घनवट व महामार्ग पोलिसांच्या मदतीने इतर वाहनांना वाट करून दिल्याने दोन तासांत वाहतूक सुरळीत झाली. सध्या उन्हाळी सुट्या संपत आल्याने व विकेंड असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. परिणामी, सध्या सायंकाळी जुना टोलनाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९-१० तास काम, ओव्हटाइम नाही, दिवसाला ६५० रुपयेच मिळतात; PMPLच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, VIDEO VIRAL

धर्मस्थळ प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेने केला धक्कादायक खुलासा; 'त्या' पुरलेल्या 100 हून अधिक मृतदेहांचे सत्य उलगडणार?

Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या! ED नंतर मुंबईत CBIचा छापा; काय आहे 2,000 कोटींच प्रकरण?

ती प्राजक्ता नाहीच! गोविंदा आणि सुनीताच्या चर्चित घटस्फोटामुळे मराठी अभिनेत्रींची का सुरू आहे बदनामी?

Latest Marathi News Updates : नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT