सातारा

थंडीची हुडहुडी.. आल्हाददायक वातावरणात चिमुकल्यांनी लुटला पक्षीनिरीक्षणाचा आनंद

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : थंडीची हुडहुडी...आल्हाददायक वातावरण अन्‌ निसर्गप्रेमींची ऊर्मी घेऊन आज इतरांबरोबर चिमुकल्यांनीही पक्षीनिरीक्षणासह निसर्गदर्शनाचा आनंद लुटला. पक्षी सप्ताहानिमित्त किरकसालमध्ये आयोजलेल्या उपक्रमात स्थलांतरित पक्ष्यांच्या दर्शनाने निसर्गप्रेमी भारावून गेले. 

दिवसेंदिवस घटत चाललेल्या वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी राज्य शासनाने पाच ते 12 नोव्हेंबर हा पक्षीसप्ताह घोषित केला आहे. किरकसाल येथील जैवविविधता समितीच्या वतीने हा सप्ताह साजरा होत असून, पहिल्याच दिवशी वन्यजीवप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. दहिवडी वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. मुळे, समितीचे अध्यक्ष अमोल काटकर, पक्षीप्रेमी चिन्मय सावंत, विशाल काटकर, वनरक्षक एस. एम. गलांडे, एम. पी. साळुंखे, यु. बी. ठोंबरे, मेनका माळशिकारे, सोनाली किसवे आदींच्या उपस्थितीत चोरमलेदरा पाणथळीवर तुतारी, धोबी, टिबुकली या पक्ष्यांच्या ओळखी करून घेत उद्घाटन करण्यात आले. 

सकाळच्या थंडीतही या उपक्रमात विशेषतः चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. निसर्गाचे निरनिराळे रूप बघून ते हरखून गेले होते. यावेळी सामान्य खरूची, पांढुरका भोवत्या, करड्या मानेचा भारीट, करडा धोबी, पिवळा धोबी, हिरवी तुतारी, सामान्य तुतारी या हिवाळी स्थलांलातरित पक्ष्यांसह तिसा, कोतवाल, चीरक, मोर, खंड्या, टिटवी हे स्थानिक पक्षी नजरेस पडले. याशिवाय स्थानिक परंतु स्थलांतर करून येणारा निळ्या रंगाच्या नीलपंखचेही (इंडियन रोलर) दर्शन झाले. या पक्ष्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाने सर्वजण भारावून गेले होते. पक्ष्यांचे आवाज, रंग, रूप यांचे निरीक्षण चिमुकले नोंदवत होते. 

पक्ष्यांचे निसर्गातील स्थान महत्त्वाचे असून, त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी समाजातील प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
-एम. पी. मुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, दहिवडी 

आत्तापर्यंत फक्त चित्रात बघितलेले पक्षी प्रत्यक्ष बघायला मिळाल्याने खूप आनंद झाला. आम्ही आता पक्षीसंवर्धन व संरक्षणासाठी प्रयत्न करणार आहोत. 
-विपुल चव्हाण, विद्यार्थी, किरकसाल 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT