सातारा

राष्ट्रवादीचे काही आमदार अपक्षांसोबत; संग्रामसिंह देशमुखांचा गौप्यस्फोट

उमेश बांबरे

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघात विरोधकांना बंडखोरी थोपविण्यात अपयश आलेले आहे, तर या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे काही आमदार महाविकास आघाडीचा उमेदवार सोडून अपक्षांसोबत फिरताना दिसत आहेत. एकूणच महाविकास आघाडीविषयीची नाराजी या निवडणुकीत मतपेटीतून दिसेल, असा गौप्यस्फोट पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला. 

साताऱ्यात श्री. देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""या मतदारसंघातून भाजपचे 24 वर्षे प्रतिनिधित्व केले. प्रकाश जावडेकरांनंतर चंद्रकांत पाटील यांचा त्यात समावेश आहे. भाजप सरकारने या मतदारसंघातील पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही प्रश्न बाकी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बॅंक, विविध संस्थांच्या सामाजिक वारसा, तसेच तेथील अनुभवाच्या जोरावर येणाऱ्या काळात आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना दिसेन.'' भाजपच्या सत्ता काळात नोकरभरतीचा प्रश्न होता. तो प्रश्न निकाली लागला असता तर पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटला असता; पण आता सरकारने एखादे महामंडळ पदवीधरांसाठी काढावे. शासनाचा एक स्वतंत्र विभाग काढावा, त्यातून पदवीधरांचे प्रश्न निकाली काढण्यात यश येऊन त्यातून एक चळवळ निर्माण होईल, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

साताऱ्यातील दोन्ही राजांची मदत घेणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, "अजिंक्‍यतारा कारखान्यावर शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा झाला. उदयनराजे आमच्यासोबत उद्या येणार आहेत. साताऱ्याचे दोन्ही महाराज हे आमचे आदराचे स्थान असून, ते आम्हाला या निवडणुकीत आशीर्वाद देण्यासाठी कायम पाठीशी राहतील.'' पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे मूळचे केडर सक्षम आहे. भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पदवीधरांच्या घरी जाऊन मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला होता. माझा आणि सातारा जिल्ह्याचा दोन पिढ्यांचा ऋणानुबंध आहे. माझ्या वडिलांनी कऱ्हाड न्यायालयात वकिली केली. माझे शिक्षणही कऱ्हाड शहरात झाले आहे. सातारा जिल्ह्यात भाजपचे संघटन आहे. सध्या आम्ही पदवीधरांच्या गाठीभेटी, मेळावे घेऊन आमची भूमिका पोचवत आहोत. माझ्या विजयात सातारा जिल्हा आघाडीवर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सदाभाऊ खोत हे आमचे नेते आहेत. त्यांची नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दूर केल्याने मतभेद मिटवून ते पुन्हा कामाला लागले आहेत. 
-संग्रामसिंह देशमुख, भाजप उमेदवार, पुणे पदवीधर मतदारसंघ 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्रच मिळणार ? 'या' दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे

Pune News: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार! प्रभाग कार्यक्रम जाहीर; पुणे जिल्ह्यातील ८७३ ग्रामपंचायतींसाठी हालचाली

मुंबईत MMRDAचा जमीनविक्रीचा सपाटा, ४ वर्षात १० हजार कोटींचे भूखंड विकले; आणखी ११ हजार कोटींचे भूखंड विकणार

Top NIT Colleges In India: भारतातील टॉप NIT कॉलेजमध्ये प्रवेशासाठी किती टक्केवारी लागेल? पाहा संपूर्ण लिस्ट

Stock Market Today : शेअर बाजाराची सपाट पातळीवर सुरुवात! IT सेक्टरवर दबाव कायम; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT