सातारा

महिलांवरील अत्‍याचारावर दोन गृहराज्‍यमंत्र्यांचं तोंड बंद का?

गिरीश चव्हाण

सातारा : राज्‍यात महिलांवरील अत्‍याचारांच्‍या घटनांमध्‍ये वाढ होत असून ते रोखण्‍यात सरकारला अपयश आलंय. एक गृहमंत्री आणि दोन गृहराज्‍यमंत्री असून त्‍यांना महिलांवरील अन्‍यायावर बोलण्‍यासाठी वेळ नाही. जिल्‍ह्यात अशा घटना घडत असूनही शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचं तोंड बंद का?, असा प्रश्‍‍न भारतीय जनता पार्टीच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषेदत उपस्‍थित केला.

राज्‍यात महिलांवरील अत्‍याचारांच्‍या घटनांमध्‍ये वाढ होत असून ते रोखण्‍यात सरकारला अपयश आलंय.

महाबळेश्‍‍वर येथील अत्‍याचार प्रकरणाची माहिती घेण्‍यासाठी चित्रा वाघ आज जिल्‍ह्यात आल्‍या होत्‍या. त्‍यांनी पहिल्‍यांदा महाबळेश्‍‍वर येथे जावून पीडिता व कुटुंबीयांची भेट घेत त्‍यांना धीर दिला. यानंतर सातारा येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍यांनी ग्रामीण गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई, तसेच सतेज पाटील (Satej Patil) यांच्‍यावर टीका केली. वाघ म्‍हणाल्‍या, महाबळेश्‍‍वर (Mahabaleshwar) येथे घडलेल्या अत्‍याचार प्रकरणात आता गंभीर बाबी समोर येत आहेत. पहिल्‍यांदा या प्रकरणात दोनच संशयित आढळले होते. नंतर त्‍यात आणखी काहीजणांचा समावेश समोर आला असून त्‍यातील अनेक संशयित पसार आहेत.

या प्रकरणात एका वकिलाचाही समावेश असून त्‍याचा महाबळेश्‍‍वर पोलीस ठाण्‍यात राबता होता. हे प्रकरण समोर आल्‍या-आल्‍या पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात का घेतले नाही, हा प्रश्‍‍न अजूनही बाकी आहे. याप्रकरणात महाबळेश्‍‍वरचे माजी नगराध्‍यक्ष दत्तात्रय बावळेकर यांची मुलं सहभागी आहेत. एकंदरच हे प्रकरण राजकीय दबावाखाली हाताळण्‍यात येत असून त्‍याचा सखोल तपास होणे आवश्‍‍यक असल्‍याचे मतही वाघ यांनी यावेळी व्‍यक्‍त केले. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होण्‍यासाठी आपण आगामी काळात तीव्र आंदोलन छेडणार असल्‍याचेही वाघ यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला! १२ चौकार अन् ५ षटकारांसह झळकावलं विश्वविक्रमी शतक

Pune Crime : पुण्यातील घायवळ टोळीविरोधात साडे सहा हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update: निवडणुकीच्या निकालाकडे ५७ देशातून लक्ष

Google Enters IPL : मोठी बातमी! 'गुगल'ची आता ‘IPL’मध्ये एन्ट्री होणार; ‘BCCI’ला तब्बल २७००००००००० रुपये मिळणार

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीचा निकाल; ५७ देशांतील नागरिकांचे ऑनलाइन लक्ष

SCROLL FOR NEXT