BJP leader Chitra Wagh esakal
सातारा

Chitra Wagh : उद्धव ठाकरेंच्या 'क्लीनचीट'मुळेच संजय राठोड मंत्री; संतप्त होत चित्रा वाघ यांनी स्पष्ट केली भूमिका

मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांच्यातील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.

हेमंत पवार

उद्धव ठाकरे यांनी कोणत्या बेसवर राठोडांना क्लीनचीट दिली हे कधीतरी त्यांना जावून विचारले पाहिजे, त्यांनी क्लीनचीट दिली नसती तर ते मंत्री झाले असते का?

कऱ्हाड : राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांच्यातील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. आज संदेश खाली प्रकरणाचा निषेध करण्यासाठी वाघ या कऱ्हाड (जि. सातारा) येथे आल्या होत्या. त्यादरम्यान त्यांना माध्यमांशी बोलताना मत्री संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी संतप्त होत आपली भूमिका जाहीर केली.

त्या म्हणाल्या, संजय राठोड यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असताना त्यांनी क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणत्या बेसवर राठोडांना क्लीनचीट दिली हे कधीतरी त्यांना जावून विचारले पाहिजे, त्यांनी क्लीनचीट दिली नसती तर ते मंत्री झाले असते का? मात्र माझी लढाई चालूच आहे, असंही चित्रा वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाघ पुढं म्हणाल्या, लोकसभेची उमेदवारी राठोडांना मिळणार की नाही, ती कोणाला मिळणार, कोणाला तिकीट देण्यात येणार या सर्व गोष्टी जर-तरच्या आहेत. माझी मात्र लढाई चालूच आहे. माझी केस आहे, ती मी लढणार आहे. ती केस उच्च न्यायालयात सुरु आहे. संजय राठोड हे उद्धव ठाकरेंच्या क्लीनचीटमुळे उभे आहेत. ज्यादिवशी त्यांचा शपथविधी झाला, त्यादिवशीही मी राठोडांविरोधात बोलले आहे. माझी लढाई संपलेली नाही, हे तेव्हाही बोलले मी आणि आजही बोलते आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT