Mahila Morcha
Mahila Morcha Sakal
सातारा

Karad News : नही चलेगी, नही चलेगी, ममता बॅनर्जींकी तानाशाही नही चलेगी; कऱ्हाडात संदेश खाली प्रकरणाचा निषेध

प्रशांत पाटील

कऱ्हाड - नही चलेगी नही चलेगी ममता बॅनर्जींकी तानाशाही नही चलेगी, ममता बॅनर्जींचा निषेध असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो या ना अशा घोषणा देत पश्चिम बंगालमधील संदेश खाली प्रकरणाचा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने आज कऱ्हाड (जि. सातारा) येथे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत निधेष करण्यात आला.

कऱ्हाड (जि. सातारा) येथील कोल्हापुर नाक्यावर ममता बॅनर्जींचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. चित्रा वाघ म्हणाल्या, पश्चिम बंगाल महिलांसाठी चालता बोलता नरक झाल्याचे दिसत आहे. संदेश खाली मधील घटना या देशाला लाजेने मान खाली घालवणाऱ्या घटना आहेत. पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असतानाही महिलांना नागवण्याचे काम केले जात आहे, हे निषेधार्ह्य आहे.

तृणमुल कॉंग्रेसचे, ममता बॅनर्जींचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिलांवर अत्याचार करत आहेत. संदेश खाली हे तर महिला आत्याचाराच्या हिमनगाचे टोक आहे. भाजपच्या रेट्याने काल संशयीत शहजान खानला अटक करण्यात आली आहे. तो ज्या पध्दतीने चालत होता, त्याची बॉडी लॅग्वेज बघता डाल मे कुछ काला है असे नाही तर पुरी डाल ही काली है अशी स्थिती आहे. शहजान खान हा बांग्लादेशातील आहे.

तेथे १० हजार कोटींचा गरीबांना देण्यात येणाऱ्या रेशनिंगचा घोटाळा त्याने केला आहे. पश्चिम बंगालची एक महिला मंत्री ज्योती प्रिया हीलाही अटक करण्यात आली आहे. शहजान खानला पकडायला गेल्यावर इडीच्या कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. ५५ दिवस देश आक्रोश करत असताना तेथे महिला मुख्यमंत्री असतानाही त्याला अटक केली गेली नाही. त्याचा आम्ही निषेध करत आहोत.

ज्या पध्दतीने संदेश खाली प्रकरणाचा निषेध करत आहात त्यापध्दतीने मणिपुरच्या घटनेचा भाजपच्या महिला आघाडीकडुन निषेध कऱण्यात आला नाही या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, मणिपुरच्या घटनेप्रमाणेच राज्यस्थानमध्येही आत्याचार झाले. त्याचाही आम्ही निषेध केला आहे. मणिपुरच्या घटनेवर केंद्र सरकार स्पष्टीकरण द्यायला तयार होते.

मात्र विरोधकांनी सत्यता ऐकून घेण्यास नकार दिला. मणिपुरवर आम्ही नक्की बोललो आहोत. महिलांवर सामुहीक आत्याचार करणाऱ्या आरोपीला ममता बॅनर्जीने ५५ दिवस आरोपीला दडवुन ठेवले. तेथील महिलांच्या अंगावर गुंड सोडण्याचे काम ममता बॅनर्जींच्या सरकारकडुन केले जात आहे. देशात आम्ही हे खपवुन घेणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT