Ajit Pawar esakal
सातारा

..त्यावेळी अजित पवार सत्तेत होते का? BJP आमदार, NCP नेत्यांत कलगीतुरा

विशाल गुंजवटे

निवडणूक तोंडावर आल्याने कोणी नाराज व्हायला नको, म्हणून दोन्ही बाजूच्या संयोजकांनी मोठ्या प्रमाणात नारळ उपलब्ध करून ठेवले होते.

बिजवडी (सातारा) : येथे विविध रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे दोनवेळा भूमीपूजन झाले असून या पुजनाच्या वादावरून भाजप आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांच्यात आरोप-प्रत्यारोपावरून राजकीय कलगीतुरा रंगलाय. त्यामुळं या कलगीतुऱ्याची व बिजवडी परिसरातील विकासकामांची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगलीय.

बिजवडी (ता. माण) येथे बिजवडी ते जगदाळेवस्ती (राजवडी) १ कोटी ९४ लाख, बिजवडी ते लिंबखोरी (येळेवाडी) रस्ता १ कोटी ४० लाख, प्रजिमा ४७ ते दडसवाडा रस्ता २ कोटी १ लाख अशा तीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार गोरे यांच्या समर्थकांनी निश्चित केला होता. परंतु, काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने युवकचे अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन केले. याप्रसंगी राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम.के.भोसले, शिवसेनेचे (Shiv Sena) उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. येळेवाडी येथे एका कार्यक्रमात प्रभाकर देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी युवकचे प्रशांत सोनबा विरकर यांच्या पाठपुराव्यातून ही कामे मंजूर झाली आहेत. त्यामुळं विरोधकांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये, तसेच श्रेयवादाच्या राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करावे, असे वक्तव्य केले होते.

त्यानंतर बिजवडीत माजी उपसरपंच संजय भोसले व रासपचे मामूशेठ विरकर यांनी आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते या रस्त्याच्या विकासकामांचे भूमीपूजनाचा कार्यक्रम लावला. त्यावेळी जि.प.सदस्य अरूण गोरे, सभापती अपर्णा भोसले, मार्केट कमिटीचे माजी सभापती तुकाराम भोसले उपस्थित होते. यावेळी आमदार जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख व प्रशांत विरकर यांच्यावर जोरदार टीका केली. बिजवडी दडसवाडा येळेवाडी रस्त्याच्या मंजुरीचे पत्र दाखवत या कामाला ७ जून २०१९ ला मान्यता मिळालीय. त्यावेळी अजित पवार सत्तेत होते का अन् हा लोधवड्याचा गडी कुठं होता असं वक्तव्य केलं. या आरोप-प्रत्यारोपामुळे बिजवडी व परिसरात राजकीय चर्चांना उधाण आलंय.

Jayakumar Gore vs Prabhakar Deshmukh

सोसायटी निवडणुकीच्या तोंडावर कलगीतुरा

बिजवडी, जाधववाडी, येळेवाडी गावची विकास सेवा सोसायटीच्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम लागला असून निवडणूकही लवकरच होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भूमीपूजनाच्या निमित्तानं राजकीय कलगीतुऱ्याच्या माध्यमातून दोन्ही बाजूकडून सोसायटीच्याच निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे.

एकाच कामाचे दोनवेळा फुटले नारळ

बिजवडीतील विविध रस्त्यांचे भूमीपूजन कोणी का करेना अन् कितीवेळाही करू देत, पण यात फायदा झाला तो मात्र नारळ विकणाऱ्यांचा. कारण, एकाच कामाचे दोनवेळा नारळ फुटले गेले. त्यात बिजवडी सोसायटीची निवडणूक तोंडावर आल्याने कोणी नाराज व्हायला नको, म्हणून दोन्ही बाजूच्या संयोजकांनी मोठ्या प्रमाणात नारळ उपलब्ध करून ठेवले होते. सर्वांना नारळ फोडण्याचा मान दिल्यामुळे शेकडो नारळ फुटले गेले असतील. या भूमीपूजनाचा फायदा नारळ विकणाऱ्यांना नक्कीच झाला असेल, अशीही चर्चा रंगलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT