court 
सातारा

BJP MLA: ''कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवले अन् पैसे लाटले''; भाजप आमदार अडचणीत!

BJP MLA Jaykumar Gore scam:याचिकेमध्ये म्हणण्यात आलंय की, कोरोना काळात सरकारने रुग्णांचे अनेक उपचार, औषधे आणि इंजेक्शन मोफत देऊ केले होते. पण, तरी गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांकडून पैसे उकळले.

कार्तिक पुजारी

सातारा- भाजप आमदार जयकुमार गोरे मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, कोरोना महामारीच्या काळात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करणारी याचिका त्यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दीपक अप्पासाहेब देशमुख यांनी ही याचिका दाखल केली आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

जयकुमार गोरे यांनी कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला. २०० पेक्षा जास्त मृत रुग्णांना जिवंत असल्याचं दाखवलं आणि सरकारी योजनांमधून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्यात आले, असा गंभीर आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. याचिकाकर्ते दीपक देशमुख हे सातारा जिल्ह्यातील मायणी ( ता. खटाव) गावचे आहेत.

याचिकेमध्ये म्हणण्यात आलंय की, कोरोना काळात सरकारने रुग्णांचे अनेक उपचार, औषधे आणि इंजेक्शन मोफत देऊ केले होते. पण, तरी गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांकडून पैसे उकळले. उपचाराच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. याप्रकरणात गोरे यांच्या पत्नी सोनिया या देखील सहभागी आहेत. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे ५ जुलैला सुनावणी होणार आहे. मायणी-खटाव येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्स सेंटर आहे. हे सेंटर सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते. या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे होते. याकाळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रं वापरण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला, असं याचिकेमध्ये म्हणण्यात आलं आहे.

याचिकेमध्ये जयकुमार गोरे यांच्याशिवाय सोनिया गोरे, खजिनदार अरुण गोरे, राकेश मेहता, महेश बोराटे, प्रवीण औताडे, अनिल बोराटे, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. सागर खाडे यांच्या नावाचा उल्लेख आहे. गोरे यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतली जात नाहीये, असा दावा देशमुख यांनी केलाय. दरम्यान, सरकारने कोरोना केंद्राना औषधे, इंजेक्शन , कर्मचार्‍यांचे वेतन यासाठी पैसा पुरवला होता. या काळात बोगस रुग्णांची नोंद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

Maharashtra Politics : ऑपरेशन ‘बुडवा’; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्या वळणावर उभा

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT