Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale esakal
सातारा

दोन्ही राजेंमध्ये शाब्दिक चकमक! 'डायलॉगबाजी'वरुन शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला टोला; म्हणाले, आता त्यांनी नवं काहीतरी..

भ्रष्टाचाराच्या आरोपांना समोरासमोर येऊन उत्तर द्यावे हे डायलॉग आता उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) बदलावेत.

सकाळ डिजिटल टीम

सातारा नगरपालिकेने आकारलेल्या घरपट्टीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे.

सातारा : भ्रष्टाचाराच्या आरोपांना समोरासमोर येऊन उत्तर द्यावे हे डायलॉग आता उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) बदलावेत. नवीन काहीतरी बोलावे आणि सातारकरांसाठी काहीतरी करून दाखवावे. सातारा पालिकेची ईडी चौकशीची मागणी ते करतात. याचा अर्थ पालिकेत भ्रष्टाचार झाला आहे, हे त्यांना मान्य आहे, असे प्रतिउत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी दिले आहे.

सातारा नगरपालिकेने आकारलेल्या घरपट्टीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. उदयनराजे यांनी बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजेंवर टीका केली होती. काय बोलायचे असेल तर समोरासमोर या, असेही आव्हान त्यांनी दिले होते. या आव्हानाला शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रतिउत्तर दिले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘उदयनराजे भोसले आणि आमचे निवासस्थान समोरासमोर आहे. त्यांना जर समोरासमोर येऊन बोलायचे असेल, तर त्यांनी खुशाल बोलावे. समोरासमोर येण्याचे सारखे सारखे तेच डायलॉग त्यांनी मारू नयेत. सातारकरांसाठी काहीतरी करावे. ते सातारा पालिकेची ईडीची चौकशी लावायला तयार आहेत. त्यांनी त्याबाबतचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना द्यावेत. कारण ते राज्यसभेचे खासदार आहेत, ते वारंवार दिल्लीला जातात. त्यामुळे अशा चौकशीची मागणी ते सहज करू शकतात.

ज्या अर्थी ते पालिकेची ईडी चौकशीच्या संदर्भाने बोलतात आणि कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. याचा अर्थ पालिकेत भ्रष्टाचार झाला आहे, हे ते त्यांना मान्य करत आहेत. सातत्याने दुसऱ्याविषयी टीकेची झोड उठवायची हे बरे नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT