सातारा

राष्ट्रवादीच्या गोतावळ्यात भाजपाचे राजे; राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या

सचिन शिंदे

कऱ्हाड : दोन जिल्ह्याचा कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (रविवार) विशेष हेलिकॉप्टरने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कऱ्हाडात आगमन झाले. त्यानंतर ते वाहनाने शासकीय विश्रामगृहात आले. त्यापूर्वी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दाेघे एकाच गाडीतून आले. या दाेघांचे एकत्रित येणे चर्चेचा विषय ठरला.

काही वेळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आमगन झाली. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवार यांची विशेष भेट घेऊन त्यांच्याशी पंधरा मिनिटे चर्चा केली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटीलहेही उपस्थित हाेते. या बैठकीमधील तपशील समजू शकला नाही मात्र  उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये त्याची दबक्या आवाजात चर्चा रंगली. तर काहींच्या भुवया उंचावल्या.

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (रविवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हेलिकॉप्टरने कऱ्हाडात आगमन झाले. येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शरद पवार थोडावेळ थांबले होते. दरम्यान सकाळपासूनच बैठकीच्या निमित्ताने कऱ्हाडातील टाऊन हॉलमध्ये विविध जिल्ह्यातील नेते व लोकप्रतिनिधी येत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे ही यापूर्वीच विश्रामगृहात येऊन थांबले होते. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकाच गाडीतून  विश्रामगृहाच्या ठिकाणी दाखल झाले.

माण तालुक्यातील कोरोनाबाधित महिलेच्या अंत्यसंस्कारास शंभरीच्यावर ग्रामस्थांची उपस्थिती, साताऱ्यातील रुग्णालयाच्या बेजाबदारपणामुळे घडली घटना 

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांची विशेष भेट घेतली. त्यामुळे तेथे उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी श्री. पवार यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण आदी उपस्थित हाेते. त्यानंतर उपस्थित सर्व नेते व लोकप्रतिनिधी टाॅऊन हाॅल येथील बैठकीच्या ठिकाणी रवाना झाले. दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क साधला असता त्यांनी मी सध्या बैठकीत आहे. तुम्हांला नंतर फाेन करताे असे सांगितले. त्यामुळे दाेन्ही नेत्यांमधील झालेल्या चर्चेचा सूर समजू शकला नाही. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT