RanjitSingh Naik Nimbalkar esakal
सातारा

राष्ट्रवादीच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी भाजप मैदानात

उमेश बांबरे

निवडणुकीत आम्ही स्वतंत्र पॅनेल देत आहोत. हे पॅनेल भाजपप्रणित सर्वसमावेशक पॅनेल असेल.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात भाजप (BJP) प्रणीत सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून पर्याय देण्याची व्यवस्था केली आहे. आमदार जयकुमार गोरेंच्या (MLA Jaykumar Gore) नेतृत्वाखाली हे पॅनेल उभे राहणार आहे. यामध्ये सर्व घटकांचा समावेश केला जाणार आहे, अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (MP Ranjit Singh Naik Nimbalkar) यांनी दिली.

जिल्हा बॅंकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र पॅनेल देत आहोत. हे पॅनेल भाजप प्रणीत सर्वसमावेशक पॅनेल असून, त्यातून जिल्हा बँकेला पर्याय देण्याचा व्यवस्था केली आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी या आधी जिल्हा बँकेतील अनेक विषय चव्हाट्यावर आणले आहेत. त्यामुळे जिल्हा जागृत झालेला आहे.

पर्याय म्हणून आमदार जयकुमार गोरे हे या पॅनेलचे नेतृत्व करतील. हे पॅनेल सर्वसमावेशक असून, जिल्ह्यातील सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे. या पॅनेलच्या निमित्ताने अनेक पक्षांची मोट बांधून जिल्हा बँकेत समर्थ पॅनेल देण्याचा प्रयत्न असणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT च्या तपासातून धक्कादायक माहिती उघड

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT