सातारा

कऱ्हाड, वडूजला गृहमंत्र्यांच्या कारभाराचा निषेध; भारतीय जनता पक्ष आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) :  ज्या पोलिस दलाचा देशातच नव्हे; तर जगभरामध्ये दबदबा आहे, अशा पोलिस दलाला बदनाम करण्याचे काम महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केले आहे, अशा गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी केली.

येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भाजपतर्फे  रविवारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक श्री. पेंढारकर, मुकुंद चरेगावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, याप्रसंगी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. 

अकलाईदेवी यात्रेबाबत झाला महत्वपुर्ण निर्णय

अब ताे ये स्पष्ट है...ठाकरे सरकार भ्रष्ट है...; भाजप कार्यकर्त्यांच्या घाेषणांनी दणाणली राजधानी

वडूज (जि. सातारा) : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, जिल्हा सचिव अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदाेलनकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही केली.

यावेळी तालुका उपाध्यक्ष अमोल साबळे, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, नगरसेवक वचन शहा, जयवंत पाटील, प्रा. अजय शेटे, संजय कुंभार, बाळासाहेब पंडोळे, विशाल महामुनी, किरण काळे, राहुल लोहार, उदय इंगळे, सूर्यकांत कोकाटे, महादेव जाधव, पांडुरंग माने, नागेश झेंडे, राजू जाधव, सचिन माने, संदीपान माने उपस्थित होते. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT