सातारा

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दहिवडीत उदया रक्तदान शिबिर

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त येथील दहिवडी कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघ, जिमखाना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व अक्षय रक्तपेढी, सातारा यांच्या वतीने दहिवडी कॉलेज येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. हे शिबीर मंगळवारी (ता. 22) सकाळी 10 ते सायंकाळी पाच या वेळेत हाेईल अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. बलवंत यांनी दिली. 

प्राचार्य डॉ. बलवंत यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, नागरिकांनी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून ऐच्छिकपणे रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.

कऱ्हाड व्हाया काश्मीर; जवान अजित पाटील, सुमनदेवीची प्यारवाली लव्ह स्टोरी

या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी अक्षय रक्तपेढीचे चेअरमन सतीश साळुंखे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. ए. एन. दडस, माजी विद्यार्थी संघ समन्वयक डॉ. एम. जे. लुबाळ, शारीरिक शिक्षण संचालक यु. ई. शिंदे, राष्ट्रीय छात्र सेना कार्यवाहक अधिकारी ए. आर. ढवळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी के. एस. शिंदे, कार्यालय अधीक्षक विलास मासाळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT