Blooming rainy season tourism in Koyna satara 
सातारा

कोयनेत बहरले पावसाळी पर्यटन

काय झाडी, काय धुके, काय तो धबधबा...सगळं ‘ओके’च

विजय लाड

कोयनानगर - मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध कोयना विभागात पावसाची सध्या जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे कोयना विभागातील नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. पर्यटनपंढरी असणाऱ्या या नगरीत पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन बंद होते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. गतवर्षी ओझर्डे या नयनरम्य धबधबा परिसरात भूस्खलन झाले. त्यामुळे आजूबाजूचा परिसर धोकादायक बनला आहे. मात्र, धबधब्याचे सौंदर्य अबाधित राहिले आहे. सध्या या परिसरात मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने या धबधब्याचे सौंदर्य ओसंडून वाहत आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या धबधब्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

सध्या या धबधब्याचा आनंद लांबूनच लुटावा लागत आहे. कोयना परिसर हा नयनरम्य व निसर्गरम्य परिसर आहे. पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य ओसंडून वाहत असते. पावसाची बरसात सुरू झाल्यावर बहरलेल्या निसर्गाचे अनोखे रूप पर्यटकांना अनुभवायाला मिळते. कोयना विभाग धबधब्याचा परिसर असल्याने प्रत्येक ठिकाणी पर्यटक ओलेचिंब होऊन निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेत आहेत. मुसळधार पावसात गरमागरम मक्याचे कणीस खाण्याची मजा औरच आहे. ठिकठिकाणी पर्यटक ही मजा लुटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT