सातारा

कोयनानगर : शिवसागरच्या बोटिंगसाठी "मानाईनगर स्पॉट' निश्‍चित

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा)  : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये डिसेंबरअखेर नौकाविहार प्रत्यक्षात सुरू झाले पाहिजे, असे शासनाचे आदेश असल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तमराव सावंत यांनी मानाईनगर येथील बोटिंग स्पॉटची पाहणी करून हा स्पॉट बोटिंगसाठी सुयोग्य असल्याचा अहवाल नुकताच दिला आहे.
 
शासनाने मार्च महिन्यांत कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये काही अटी व शर्थींचे पालन करून बोटिंग सुरू करायला परवानगी दिली असली, तरी बोटिंग स्पॉट अंतिम झालेला नसल्यामुळे परवानगी कागदावर तरंगत होती. याबाबत सकाळने सातत्याने पाठपूरावा सुरु ठेवला. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा शिवसागर जलाशयातील बाेटींग बाबत हालचाली सुरु केल्या. 

अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तमराव सावंत यांनी काही दिवसांपुर्वी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाची पाहणी करून नौकाविहारासाठी कोयना धरणाच्या भिंतीपासून सात किलोमीटरपुढे असणारा मानाईनगर येथील यमकर या नावाने प्रसिद्ध असलेल्या स्पॉटची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हा स्पाॅट अंतिम केला आहे. 

याबाबत श्री. शिंदे म्हणाले, ""पर्यटनातून स्थानिक विकास हे शासनाचे धोरण आहे. वन्यजीव विभागाने स्थानिक जनतेबरोबर समन्वय ठेऊन त्यांचे सहकार्य घेऊन विकास साधावा. सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर जो विकासाचा आराखडा वन विभागाने राबविला आहे त्याची अंमलबजावणी वन्यजीव विभागाने कोयनेत करावी, अशा सूचना वन्यजीव विभागाला दिल्या आहेत.''

महाकवी महात्मा फुलेंचे कवितांमधून समाजचिंतन

 

वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांसह मानाईनगर येथील जागा पाहून बोटिंग स्पॉटसाठी सुयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. डिसेंबरअखेर हा बोटिंग स्पॉट कार्यान्वित करण्याचे आदेश आहेत. पोलिस दलाने याठिकाणी कोणत्या अटी व शर्थी असाव्यात याबाबतचे मार्गदर्शन गृह विभागाकडे मागितले आहे. लवकरच गृह विभाग या मार्गदर्शन सूचना देऊन लवकरच नौकाविहार सुरू करण्यात येईल.

- रामचंद्र शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, सातारा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT