lonand sakal
सातारा

अंदोरीतील सख्या बहीण-भावाचे मृतदेह नीरा उजव्या कालव्यात सापडले

लोणंद पोलीस कालपासून या मुलांचा शोध घेत होते

रमेश धायगुडे, लोणंद.

लोणंद : अंदोरी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षाचा मुलगा अशिष व अडीच वर्षाची मुलगी ऐश्वर्या कालपासून बेपत्ता झालेल्या या लहानग्या सख्या बहीण भावांचे मृतदेह आज (ता. २९) सकाळी नीरा उजव्या कालव्यात पाडेगाव व पिंपरे बुद्रूक गावच्या हद्दीत आढळून आले. लोणंद पोलिसांनी (lonand police) ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करून लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

लोणंद पोलीस कालपासून या मुलांचा शोध घेत होते. महाबळेश्वर (Mahabaleshvar) येथील महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत शोध घेवूनही काहीच हाती लागले नव्हते. मात्र आज ( ता. २९) रोजी सकाळी शोध घेत लोणंद पोलिसांना पाडेगाव हद्दीतील तुकाईनगर परिसरात निरा उजव्या कालव्यात पाण्यात आशिष प्रशांत राणे या चार वर्षाच्या लहानग्याचा तर दुपारी ऐश्वर्या या आडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह पिंपरे बुद्रूक गावच्या हद्दीत चव्हाण वस्ती आढळून आला. हे दोघेही घरात आजी समवेत घरी होते तर त्यांचे आई वडिल शेतात कामासाठी गेले होते.

मात्र, नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी बाहेर गेलेली हे दोघेही बहिण भाऊ शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासुन बेपत्ता झाली होते. लोणंद पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्यावर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून लोणंद पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यात त्वरीत सुरुवात केली. रात्री उशीरापर्यंत शोध घेवूनही काही हाती लागले नव्हते. मात्र आज सकाळी या दोन्ही मुलांचे मृतदेह नीरा उजव्या कालव्यात आढळून आले. या घटनेबाबत अंदोरी व रुई गावावर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून दुःख व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरिक्षक गणेश माने हे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SCROLL FOR NEXT