सातारा

बोंडारवाडी धरण निश्‍चित झालेल्या रेषेवरच व्हावे; शिवेंद्रसिंहराजेंनी लक्ष घालण्याचे समितीचे आवाहन

विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : बोंडारवाडी येथे होणाऱ्या धरणाच्या निश्‍चित झालेल्या मूळ रेषेवर धरण झाले तर पश्‍चिम व मध्य जावळीतील 54 गावांचा पिण्याचा व शेतीचा पाणीप्रश्न मिटेल. 30 वर्षांचा विचार न करता 100 वर्षांचा विचार करून सुधारित केलेल्या प्रस्तावाप्रमाणे धरण होण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी लक्ष घालून तातडीने प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांच्यासह सर्व कृती समितीने येथे पत्रकार परिषदेत केले.
 
लोकप्रतिनिधी म्हणून शिवेंद्रसिंहराजेंनी बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. मात्र, आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होऊनही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता संबंधित अधिकारी या आंदोलनाचा इफेक्‍ट कमी करण्याचे काम करताहेत, असा प्रश्न उपस्थित करून आमदार भोसले यांनी लक्ष दिल्यास बोंडारवाडी धरणाचा प्रश्न लवकर मार्गी लागेल व सुधारित प्रस्तावाबाबतची बैठक होऊन कामाला गती येईल, असा विश्वासही श्री. मोकाशी यांनी व्यक्त केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील मोठ्या घोषणा वाचा एका क्लिकवर

मूळ धरणरेषा निश्‍चित झाली असून ती गावापासून 100 ते 150 मीटरवर आहे. हीच जागा योग्य असून याच जागेवर धरण झाले तरच धरणाचा हेतू सफल होईल. त्यासही यापूर्वी तत्त्वतः मान्यता मिळाली होती. त्यामुळे मूळ धरण रेषा बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. धरणाचे अंदाजपत्रक करण्यास दिरंगाई होत आहे. हे धरण मातीऐवजी सिमेंटमध्ये व्हावे. त्यामुळे पाण्याची गळती होणार नाही आणि खालची गावेही सुरक्षित राहतील, अशीही मागणी त्यांनी केली. 

यावेळी मोहनराव कासुर्डे, आदिनाथ ओंबळे, हरिभाऊ शेलार, विलास शिर्के, सुरेश कासुर्डे, जे. डी. जुनघरे, जगन्नाथ जाधव, सुरेश पार्टे, विजय सपकाळ, संजय दळवी, भास्करराव धनावडे, रघुनाथ पार्टे, बजीरंग चौधरी, श्रीरंग बैलकर, हणमंत शिंगटे, उषा उंबरकर, राणी पठाडे आदी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT