सातारा

कोटींची फसवणूक करणारे काेल्हापूरसह सातारा जिल्ह्यातील युवकांना अटक

प्रवीण जाधव

सातारा : बेरोजगार तरुणांना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बॅंकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एक कोटींची फसवणूक करून वर्षाभरापूर्वी पसार झालेल्या दोघांना बोरगाव पोलिस आणि सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने अटक केली.
सातारकरांनो, मला माफ करा.. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवलीय

सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, माण, जावळी, कऱ्हाड, पाटण या तालुक्‍यांतील बेरोजगार तरुण, तरुणींना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बॅंकेत नोकरी लावतो, असे आमिष संशयितांनी दाखवले होते. या तरुणांना त्यांनी कोलकाता येथे नेऊन बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी तीन ते पाच लाख रक्कम स्वीकारली. अशी सुमारे एक कोटींची रक्कम या युवकांकडून त्यांनी उकळली. फसवणूक झालेल्या युवकांनी मागील वर्षी बोरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

सातारा : स्वत:हून होम आयसोलेशनचा निर्णय आला अंगलट

या प्रकरणी काही संशयितांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्रही दाखल केले होते. परंतु, त्यातील दोघे पसार होते. अखेर पाेलिसांना नीलेश महादेव कोकणी (दहिवडी, ता. माण), सचिन केपन्ना तरपदार (वय 34, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या दाेघांना पकडण्यात यश आले.

कोल्हापुरातील ऍट्रॉसिटी गुन्हा मागे घेण्यासाठी लाखोंच्या खंडणीची मागणी 

दरम्यान, कोकणी हा दोन दिवसांपूर्वी दहिवडीत आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या टीमसह दहिवडी गाठले. तेथे सापळा रचून कोकणीला अटक केली. दुसरा संशयित सचिन हा पनवेल येथे असल्याची माहिती शेख यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने तेथे जाऊन तरपदारला अटक केली.

एक लाख दे, नाहीतर तुझं करिअर बरबाद करु; वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT