Morna River esakal
सातारा

जनावरं धुण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्यावर काळाचा घाला; मोरणा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

जनावरे धुण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा मोरणा नदीत (Morna River) बुडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : जनावरे धुण्यासाठी गेलेल्या मामा भाच्याचा मोरणा नदीत (Morna River) बुडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सोनवडे (ता. पाटण) येथे घटना घडली. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली. अशोक शंकर कदम (वय 35, रा. सुळेवाडी, ता. पाटण) व अनिकेत हरिबा चव्हाण (17, रा. जिंती, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहेत. अनिकेत मामाच्या गावी आला होता. (Both drowned in Morna River Patan Satara Crime News)

जनावरे धुण्यास गेलेले मामा भाचे बेपत्ता झाल्याचे बुधवारी सायंकाळी स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. कालही (गुरुवारी) दिवसभर शोध मोहीम सुरू होती. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह नदीत सापडले. त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळासह पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्‍यातील सोनवडे येथे जनावरे धुण्यासाठी अशोक कदम व त्यांचा भाचा हरिबा गेले होते. बुधवारी सायंकाळीही ते न परतल्याने त्यांचा शोध सुरू झाला. अशोक कदम बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भाचा अनिकेत (रा. जिंती, ता. पाटण) यांच्या समवेत मोरण नदीवर जनावरांना धुण्यासाठी गेले होते. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने कुटुंबांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, दोघेही सापडले नाहीत.

कालही (गुरुवारी) सकाळपासून शोध सुरू होता, तरीही त्यांचा पत्ता लागला नाही. त्यानंतर नदीत मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामस्थांना समजली. त्यांनी खात्री केली. त्या वेळी अनिकेतचा मृतदेह असल्याची खात्री पटली. त्यानंतर काही वेळाने अशोक यांचा मृतदेह नदीत आढळला. मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक नितीन चोखंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा होऊन नोंद झाली आहे. मृतदेहांची पाटण येथील ग्रामीण रुग्णालयातच उत्तरीय तपासणी झाली. त्यातही बुडून मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अशोक मामा तर अनिकेत भाचा आहे. त्या दोघांचा मोठा जिव्हाळा होता. अशोक अविवाहित आहे. सहकारी संस्थेत ते नोकरीस आहेत. अनिकेत बारावीत आहे. अनिकेतचे मूळ गाव जिंती आहे. तो एकुलता मुलगा होता. लग्नासाठी तो मामाच्या गावी आला होता. मामा आणि भाचा या दोघांवर काळाने घाला घातल्याने सोनवडे व सुळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Both Drowned in Morna River Patan Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT