Jeep Accident Sakal
सातारा

सातारा : काळजजवळ अपघातात नवरदेवाचा मृत्यू

लोणंद-फलटण रस्त्यावर अपघात झाला

विकास खिलारी

लोणंद - लोणंद-फलटण रस्त्यावर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळज ( ता. फलटण) जवळ जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात नुकतेच लग्न झालेल्या आणि जेजुरीहून धुळदेवकडे ( ता. फलटण) निघालेल्या नवरदेवाचा मृत्यू झाला, तर अन्य काही जण जखमी झाले आहेत.

याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बार्शी ( जि. सोलापूर) येथील नुकतेच लग्न झालेले नवरदेव सुखदेव रवींद्र वाघमोडे ( वय २६) हे आपल्या लग्नानंतर देवदर्शनासाठी जीपगाडीतून नातेवाईकांसमवेत जेजुरी येथून लोणंद-फलटण रस्त्यावरून फलटण तालुक्यातील धुळदेव या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळजजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. त्यामध्ये नवरदेव सुखदेव हा गंभीर जखमी झाला.

त्यास तातडीने फलटण येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, जीप गाडीतील अन्य काही जण जखमी झाले आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात रात्री उशिरा करण्यात आली. लोणंद पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, सध्‍या लोणंद-फलटण रस्त्याच्या सहापदरीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी ही कामे करताना संबंधित यंत्रणेकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने या रस्त्यावर अपघातांच्या घटना घडत आहेत, अशा प्रतिक्रिया वाहनचालक व प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT