car accident sakal
सातारा

पसरणी घाटात 'द बर्निग कार'चा थरार; भाऊ बहीण थोडक्यात बचावले

वाई- पाचगणी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

सकाळ वृत्तसेवा

वाई : येथील पसरणी घाटात आज एका कारने अचानक पेट घेतला. वाई- पाचगणी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागल्याने चालकाने त्वरीत गाडी बाजूला घेतली. त्यानंतर बोनेट उघडले असता गाडीने पेट घेतला आणि गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.

यावेळी कोणतीही जीवित हानी झाली नाही. गाडीतून भाऊ व बहीण दोघेही खाली उतरले होते. त्यामुळे ते सुखरूप आहेत. याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पनवेल येथील ओंकार कृष्णा बसवंत व सुचिता कृष्णा बसवंत हे भाऊ- बहीण टाटा टिगोर कार (क्र. एमएच ०१ डीपी ०८५१) मधून गुरुवारी (ता.१४) महाबळेश्वरला फिरायला निघाले होते. वाईहून पाचगणीला जात असताना दुपारी अडीजच्या सुमारास पसरणी घाटातील दत्त मंदिराच्या अलीकडे गाडीतून धूर येऊ लागला.त्यामुळे चालक ओंकार बसवंत याने गाडी बाजूला घेऊन बोनेट उघडले. त्यावेळी गाडीने पेट घेतला. याबाबतची माहिती मिळताच वाई - पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी वाई व पाचगणी येथील अग्निशामक दलाला कळविले. पाचगणीच्या अग्निशामक बंबाने घटनास्थळी येऊन आग विझवली. परंतु गाडी संपूर्ण जळून खाक झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. दरम्यान या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाल्याने घाटात दोन्ही बाजूस वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT