सातारा

छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ऍड. सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : छत्रपती घराण्याविषयी अपशब्द उच्चारत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शुक्रवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात ऍड. गुणरत्न सदावर्ते (रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद राजेंद्र बाबुराव निकम (रा. तारळे, ता.पाटण) यांनी नोंदवली आहे. 

फिर्यादीत निकम यांनी म्हटले आहे की, सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि. 7 ऑक्‍टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मी, तसेच इतर समाज बांधव उपस्थित होते. बैठक सुरु असतानाच ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी वृत्तमालिकेवर मुलाखतीदरम्यान छत्रपती घराण्याविषयी, तसेच खा. उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याची माहिती मिळाली.

यानुसार माहिती घेतली असता, ऍड. सदावर्ते यांनी अपशब्द घेतल्याचे समोर आले. ऍड. सदावर्ते यांनी जातीय दंगली भडकतील, सामाजिक तेढ निर्माण होवून अशांतता निर्माण होईल, यासाठी हे वक्‍तव्य केले असून त्यामुळे माझ्या भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याचा तपास सहाय्यक निरीक्षक बाजीराव ढेकळे हे करीत आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT