सातारा

टेंभूत जेवणाच्या पार्टीत युवकावर तलवारीने वार; कऱ्हाडात चौघांवर गुन्हा

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : जेवणाच्या पार्टीत घरी जा, असे म्हणणाऱ्यावर तलवारीने वार केल्याची घटना टेंभू (ता. कऱ्हाड) येथे काल रात्री उशिरा घडली. कुलदीप संजय थोरात (वय 28 रा. कार्वे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुलदीप थोरातच्या टेंभू येथील शेतात काल जेवणाची पार्टी होती. त्या पार्टीत रात्री गोंधळ झाला. त्यात जेवणासाठी कुलदीपचे मित्र हर्षल थोरात, संतोष खेराडकर, बंडा कोळी, ऋषभ थोरात (सर्व रा. कार्वे) उपस्थित होते. पार्टीला अनिकेत हिरोजी त्यांचा मित्र स्वप्नील थोरात, शुभम होते. वस्तीवरील शेतात पार्टी करत असताना स्वप्नील थोरात मोठमोठ्याने ओरडून दंगा करू लागला. त्यामुळे कुलदीपने त्यास तू येथून जा, असे म्हणाला. त्याचा राग आल्याने स्वप्नील निघून गेला. तो गजानन सोसायटी येथील त्याचे मित्र गणेश काटकर, बाब्या कुलकर्णी, अक्षय पुजारी यांना कारमधून घेऊन तेथे आला, असे फिर्यादीत म्हटले आहे. थोरातने त्याच्या हातातील तलवारीने कुलदीपवर वार केला. तो कुलदीपच्या डोक्‍यात लागला आहे. त्याला जखम झाली आहे. गणेश काटकर, बाब्या कुलकर्णी, अक्षय पुजारी यांनीही मारहाण केली आहे. त्यात हर्षल थोरात, संतोष खेराडकर, बंडा कोळी, ऋषभ थोरात यांना मार लागला आहे. चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

SCROLL FOR NEXT